एक्स्प्लोर
ATM मध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या तिघांनी 38 लाख लांबवले
डोंबिवली : एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या तिघांनीच पैशांवर डल्ला मारल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या तीन महाठगांनी 38 लाख 60 हजार रुपयांची रक्कम लांबवली.
15 मे रोजी संध्याकाळी ही घटना घडली. हे सर्व आरोपी रायटर सेफगार्ड कंपनीचे कर्मचारी आहेत. ही कंपनी एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्याचं काम करते.
आरोपी राकेश पवार, नयन भानुशाली, ज्योतिष गुप्ता ज्या एटीएममध्ये पैसे भरले, तिथे पुन्हा गेले. एटीएम उघडण्यासाठी जो पासवर्ड असतो, त्याचा वापर करुन मशिन उघडलं. चारही एटीएममधून पैसे काढले आणि तिथून पोबारा केला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी 16 मे रोजी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान आरोपींचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement