एक्स्प्लोर
भंडाऱ्यात सलाईनमधून विष घेऊन 30 वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

भंडारा : भंडारा जिल्ह्यात अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. 30 वर्षीय डॉ. प्रितिश भोयर यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. डॉ. प्रितिश भोयर हे भंडाऱ्यातील गुजराती कॉलनीमध्ये राहत होते. डॉ. भोयर यांनी राहत्या घरीच टोकाचं पाऊल उचललं. चर्मरोग तज्ज्ञ असलेले डॉ. प्रितिश भोयर हे एमबीबीएस, एमडी होते. ते स्वतःचं क्लिनिक चालवायचे. सलाईनच्या माध्यमातून विष घेऊन डॉ. प्रितिश भोयर यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यानुसार, पोटाच्या विकाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























