एक्स्प्लोर

18 ऑक्टोबरपासून कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात : मुख्यमंत्री

कर्जमाफी योजना जाहीर करुनही अद्याप लाभ न मिळाल्याने सरकारवर चौफेर टीका सुरु होती. मात्र दिवाळीच्या तोंडावर कर्जमाफीचा लाभ दिल्याने कर्जाच्या ओझाखाली जगणाऱ्या बळीराजाची दिवाळी आनंदाने साजरी होणार आहे.

जालना : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 18 ऑक्टोबरपासून मिळणार आहे. ज्यांनी निकष पूर्ण केले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे 18 ऑक्टोबरपासून जमा होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कर्जमाफी फॉर्म भरलेल्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा

जालना दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. कर्जमाफी योजना जाहीर करुनही अद्याप लाभ न मिळाल्याने सरकारवर चौफेर टीका सुरु होती. मात्र दिवाळीच्या तोंडावर कर्जमाफीचा लाभ दिल्याने कर्जाच्या ओझाखाली जगणाऱ्या बळीराजाची दिवाळी आनंदाने साजरी होणार आहे. https://twitter.com/ANI/status/919914988159909888 https://twitter.com/raosahebdanve/status/919913755244244994 https://twitter.com/raosahebdanve/status/919915242154373121 राज्यातील शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. 24 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी ही कर्जमाफी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ म्हणून ओळखली जाणार आहे. या योजनेचा लाभ पीक कर्जासह मध्यम मुदतीच्या कर्जधारकांनाही होणार आहे. दिनांक  1 एप्रिल 2012  ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी खास योजना दीड लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (One Time Settlement) राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र थकबाकी रकमेच्या 25 टक्के किंवा दीड लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. 2012 – 2013 ते 2015 – 2016 या चार वर्षांत ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे, परंतु 30 जून 2016 रोजी ते थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्यांनी कर्ज मुदतीत फेडले आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून पीक कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येईल. ‘यांना’ कर्जमाफीतून वगळलं!  राज्यातील आजी-माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, केंद्र आणि राज्य सरकारचे तसेच निमशासकीय संस्था आणि अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या कर्जमाफीसाठी पात्र असणार नाहीत. करदाते आणि व्हॅट भरणारे व्यापाऱ्यांनाही कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी? अहमदनगर – 2 लाख 869 औरंगाबाद – 1 लाख 48 हजार 322 बुलडाणा – 2 लाख 49 हजार 818 गडचिरोली – 29 हजार 128 जळगाव – 1 लाख 94 हजार 320 लातूर – 80 हजार 473 नागपूर – 84 हजार 645 नाशिक – 1 लाख 36 हजार 569 परभणी – 1 लाख 63 हजार 760 रत्नागिरी – 41 हजार 261 सिंधुदुर्ग – 24 हजार 447 वाशिम – 45 हजार 417 अकोला – 1 लाख 11 हजार 625 बीड – 2 लाख 8 हजार 480 चंद्रपूर – 99 हजार 742 गोंदिया – 68 हजार 290 जालना – 1 लाख 96 हजार 463 मुंबई शहर – 694 मुंबई उपनगरे – 119 नांदेड – 1 लाख 56 हजार 849 उस्मानाबाद – 74 हजार 420 पुणे – 1 लाख 83 हजार 209 सांगली – 89 हजार 575 सोलापूर – 1 लाख 8 हजार 533 यवतमाळ – 2 लाख 42 हजार 471 अमरावती – 1 लाख 72 हजार 760 भंडारा – 42 हजार 872 धुळे – 75 हजार 174 हिंगोली – 55 हजार 165 कोल्हापूर – 80 हजार 944 नंदुरबार – 33 हजार 556 पालघर – 918 रायगड – 10 हजार 809 सातारा – 76 हजार 18 ठाणे – 23 हजार 505 ..म्हणून आकडेवारीत वर्ध्याचं नाव नाही! मुख्यमंत्री कार्यलायने ट्विटरवरुन कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर केली. मात्र यात वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नाही. यासंदर्भात एबीपी माझाने वर्ध्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली असता, असे लक्षात आले की, सुधारित सर्क्युलर आल्यावर वर्ध्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार होईल. जिल्हा बँकेच्या एप्रिल 2012 ते जून 2017 पर्यंत दीड लाख रुपयांच्या घरात असणारे जवळपास 4 हजार 393 शेतकरी असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कडू यांनी दिली. तर यात राष्ट्रीय बँकांची आकडेवारी अद्याप तयार झालेली नसल्याचं जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक वामन कोहाड यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gyanesh Kumar New Election Commissioner Of India :  ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special ReportJayant Patil BJP? : जयंत पाटलांच्या मनात चाललंय तरी काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.