एक्स्प्लोर
एक पेंग्विन गेला, आता राणीच्या बागेत दुसरा पेंग्विन
मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेत मृत्यू झालेल्या पेंग्विनच्या बदल्यात दुसरं पेंग्विन आणलं जाणार आहे. काल संध्याकाळी राणीच्या बागेतील एका पेंग्विनचा जीवाणू संसर्गामुळे मृत्यू झाला होता.
राणीच्या बागेत ठेवण्यासाठी दक्षिण कोरियाहून आठ पेंग्विनचा आणण्यात आले होते. या आठ पेंग्विनपैकी एका मादीचा जीवाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. पेंग्विनची काळजी घेण्यासाठी गोवा ट्रेड फार्मिंग कंपनी, थायलंड या एजन्सीला तीन महिन्यांसाठी केअर टेकींगचं कंत्राटही देण्यात आलं होतं.
तीन महिन्याच्या आतच राणीच्या बागेतील एका पेंग्वीनचा मृत्यू झाला. या पेंग्विनच्या बदली दुसरं पेंग्विन पाठवण्यासाठी राणीची बाग प्रशासन गोवा ट्रेड फार्मिंग कंपनीला पत्र लिहिणार आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत नागरिकांसाठी पेंग्वीन दर्शन खुलं करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही राणीची बाग प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
राणीच्या बागेतील एका मादी पेंग्विनचा जिवाणू संसर्गामुळे मृत्यू
बालहट्टामुळे एका पेंग्विनचा मृत्यू, नितेश राणेंचा निशाणा
पनवती लोकांकडून पेंग्विनबाबत टीका : उद्धव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement