एक्स्प्लोर
ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी
मालेगाव रोडवर असलेल्या अग्रवालनगरजवळ आज सकाळी साडे अकरा ते पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.
धुळे : ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने धुळ्यात एका 65 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा पती गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मालेगाव रोडवर असलेल्या अग्रवालनगरजवळ आज सकाळी साडे अकरा ते पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.
स्कूटर स्लिप झाल्याने चंदनमाला विजय भंडारी ह्या मागून भरधाव येणाऱ्या ट्रकखाली आल्या. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती विजय भंडारी हे गंभीर जखमी झाले.
विजय भंडारी हे धुळे शहरातील सराफ व्यावसायिक आहेत. अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या घटनेमुळे सराफ बाजारात शोककळा पसरली होती.
दरम्यान, अपघात घडल्यानंतर जमावाने ट्रकवर दगडफेक केली. ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement