एक्स्प्लोर
धुळ्यातील चित्रपटगृहात जोडप्यांचे अश्लील चाळे, पोलिसांच्या दामिनी पथकाचा छापा
धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहातील बॉक्समध्ये दोनशे रुपये प्रतितास याप्रमाणे पैसे घेऊन जोडप्यांना विशिष्ट जागा देण्यात यायची. या ठिकाणी ही जोडपी अश्लील चाळे करत. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांच्या दामिनी पथकाला समजताच त्यांनी यावर कारवाई केली.
धुळे : धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्योती चित्रपट गृहात जोडप्यांना अश्लील चाळे करताना रंगे हात पकडलं आहे. धुळे पोलिसांच्या दामिनी पथकाकडून हा छापा टाकण्यात आला आहे. यात 10 युवक, युवतींना अटक करण्यात आलं आहे.
धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहातील बॉक्समध्ये दोनशे रुपये प्रतितास याप्रमाणे पैसे घेऊन जोडप्यांना विशिष्ट जागा देण्यात यायची. या ठिकाणी ही जोडपी अश्लील चाळे करत. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांच्या दामिनी पथकाला समजताच त्यांनी यावर कारवाई केली.
VIDEO | महिलांना धमकावून अश्लील चाळे करणाऱ्याला अटक | वसई | एबीपी माझा
सिव्हिल ड्रेस मध्ये असलेल्या दामिनी पथकातील एक महिला आणि पुरुष पोलीस अशा दोघांनी नकली जोडपं बनून चित्रपटगृहात प्रवेश केला. चित्रपटगृहात गेल्यावर मिळालेल्या माहितीची खातरजमा केली असता चित्रपट गृहातील बॉक्समध्ये काही जोडपी अश्लील चाळे करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी ताबतोब छापा टाकतं आठ जोडप्यांना ताब्यात घेतलं.
छापा टाकण्याची कारवाई सुरु असताना एकूण 16 आरोपींपैकी 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सहा आरोपी गर्दीचा फायदा घेत पसार झाले आहेत.
VIDEO | मुलुंडच्या नवघरमधील एटीएममध्ये तरुणाचे अश्लील चाळे | मुंबई | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
Advertisement