पंढरपूर : राज्यात आणि देशात ऑक्सिजनचा होत असलेल्या तुटवड्यामुळे गावोगावचे हजारो कोरोना रुग्ण श्वासासाठी धडपडत असताना आता साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मित्तीचा पहिला पायलट प्रोजेक्ट प्रकल्प धाराशिव साखर कारखान्यावर उभारला जात आहे. या धाराशिव कारखान्यातून शनिवारी 20 टन ऑक्सिजन बाहेर पडणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर पंढरपूरचे तरुण उद्योजक अभिजित पाटील यांनी नुकसान सोसत हे पाहिले पाऊल उचलले आहे.
 
वसंतदादा इन्स्टिट्यूटने 23 एप्रिल रोजी झूम मीटिंगद्वारे  राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मीटिंग घेतली होती. राज्यात 174 इथेनॉल निर्मिती करणारे साखर कारखाने असून आता अभिजित पाटील यांच्यानंतर इतर कारखान्यांनी हा प्रकल्प हातात घेतल्यास राज्यालाच नाही तर देशालाही ऑक्सिजन पुरेल एवढी क्षमता महाराष्ट्रात तयार होऊ शकणार आहे. ज्या कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहेत. अशा प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत 'मॉलेक्युलर सिव्ह' वापरून हवेतील वायुद्वारे ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करता येते, हे अभिजीत पाटील यांनी लक्षात घेत आपल्या  धाराशिव साखर कारखाना प्रतिदिन 16 ते 20 टन ऑक्सिजनची निर्मिती करण्याची तयारी सुरु केली आहे. 


Greta Thunberg: कोरोनाशी संघर्ष करणाऱ्या भारताला मदत करा; पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गचे जागतिक समुदायाला आवाहन


येत्या दोन दिवसात मशिनरीत थोडाफार बदल करून शुक्रवारी याची ट्रायल होणार आहे. येत्या शनिवारपासून रोज 20 टन ऑक्सिजन कोरोनाग्रस्तांना उपलब्ध होणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्याची गरज 18 टन असून सोलापूर जिल्ह्याची गरज 30 टन ऑक्सिजनची असून एकदा उत्पादन सुरु झाल्यावर याची क्षमता 30 टनापर्यंत वाढवणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले. हा प्रकल्प कारखानदारांना तोट्याचा असल्याने राज्य सरकारने अशा कारखान्यांना थोडी मदत दिल्यास राज्याचा ऑक्सिजनचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.  


महत्वाच्या बातम्या :