1. मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश, केंद्राकडून महाराष्ट्रासाठी रेमडेसिवीरचा साठा मंजुर, 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्सचा पुरवठा होणार
2. राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याबाबत मुख्यमंत्री 1 मे रोजी निर्णय घेतील, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
3. कोविशील्ड, कोवॅक्सिन लस 150 रुपयांनाच खरेदी करणार, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, राज्यांना लसीचा पुरवठा मोफत
4. सीरम पाठोपाठ भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचे दरही निश्चित, राज्य सरकारला 600 रुपये, तर खाजगी रुग्णालयांना 1200 रुपये प्रति डोस दराने उपलब्ध होणार
5. दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा, काल ऑक्सिजनअभावी जयपूर गोल्डन रुग्णालयातील 25 रुग्णांचा मृत्यू, तर गंगाराम रुग्णालयात पुन्हा तासभर पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 25 एप्रिल 2021 | रविवार
6. देशातील ऑक्सिजन तुटवड्यावर दिल्ली हायकोर्टाची कठोर भूमिका, ऑक्सिजन पुरवठ्यात आडकाठी करणाऱ्याला थेट फासावर लटकवण्याचा इशारा
7. आजपासून कोविड रुग्णांना बेड देण्याआधी वैद्यकीय चाचणी होणार, मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाचा निर्णय
8. यवतमाळच्या घाटंजी कोविड केअर सेंटरमधून 20 कोविड रुग्णांचं पलायन, पोलिसांकडून शोध सुरु
9. अनिल देशमुखांच्या मालमत्तेची काल सीबीआयकडून 12 तास झाडाझडती, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि महत्त्वाचे दस्तऐवज हस्तगत
10. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 79व्या पुण्यतिथीनिमित्त लतामंगेशकर आणि संगीत नाट्यसृष्टीतील दिग्गजांकडून ऐका मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची महती https://bit.ly/2S2MqAI