'पंकजाताईंना फोन नाही करु शकलो, पण काळजी घे असा मेसेज केला आहे.'- धनजंय मु़ंडे
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. याआधी पंकजा मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती.
बीड : माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यावेळी त्यांना ओमायक्रॉन व्हेरियंटची बाधा झाली झाली आहे. गतवर्षी 2019 मध्ये मार्च महिन्याअखेरीस पंकजा मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी याबाबत भाष्य करताना 'मी पंकजाताईला फोन नाही करु शकलो, पण मेसेज करुन काळजी घे असं सांगितलं आहे. पोस्ट कोव्हिड अधिक त्रास होतो त्यामुळे काळजी घे असं सांगितल्याचं मुंडे म्हणाले.' तसंच बीड जिल्ह्याच्या जनतेला मुंडे यांनी कोरोना अजून गेला नसून काळजी घ्या असं आवाहनही केलं.
पंकजा यांना कोरोनाची लागण झाली असून मिळालेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. त्या घरीच उपचार घेत आहेत. पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमान यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नसोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. तेथून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या नेत्यांना कोरोनाची लागण
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार इंद्रनील नाईक
आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
महत्वाच्या बातम्या
- COVID19: मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी, आज 8,036 रुग्णांची नोंद; धारावीतही संसर्ग वाढतोय
- Mumbai Corona : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास शिवसैनिकांकडूनच हरताळ; मालवणी जत्रोत्सवात तुफान गर्दी, कोरोना नियमांची ऐशीतैशी
- Video : राष्ट्रवादी काँग्रेसच्या डान्स स्पर्धेत कोरोना नियमांचा फज्जा, व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha