उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला, औरंगजेब फॅन क्लबचेच असल्याचं त्यांनी दाखवलं; फडणवीसांचा पलटवार
Devendra Fadnavis: एखादी व्यक्ती फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघाडल्यासारखे बोलत असते, त्यावेळी त्याला उत्तर द्यायचे नसते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणे : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पुण्यातील मेळाव्यातून अमित शाहांवर केली आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे हताश निराश झाले. त्यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय अशी टीका फडणवीसांनी केली आहे. आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे त्यांनी दाखवून दिलं असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले आहे. ते नागपुरात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय. ते सध्या अत्यंत फ्रस्ट्रेशनमध्ये आहे. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे, त्यावर आपण काय उत्तर देणार आहोत. एखादी व्यक्ती फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघाडल्यासारखे बोलत असते, त्यावेळी त्याला उत्तर द्यायचे नसते. पण हे भाषण करून त्यांनी आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे त्यांनी दाखवून दिलं .
जे काही समोर येत आहे त्याची योग्य चौकशी करू : देवेंद्र फडणवीस
सचिन वाझेंनी माझी नार्को टेस्ट करा असे म्हटले आहे याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पण माध्यमातून बघितले आहे.. मला पत्र पाठवले तुमच्या माध्यमातूनच पहिले. अजून मी काही पाहिले नाही. कारण मी दोन दिवस नागपुरात आहे. असे काही आले असेल तर मी ते पाहून त्याच्यावर प्रतिक्रिया देईल. जे काही समोर येत आहे त्याची योग्य चौकशी करू.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
पुण्यात झालेल्या मेळाव्यात आज उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह हे अहमदशाह अब्दालीचे वंशज आहेत अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तर भाजपचा राज्यात सत्ता जिहाद सुरू आहे असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले, आजपासून मी अमित शाहला अहमदशहा अब्दाली म्हणणार आहे. तो मला नकली संतान म्हणतो, औरंगजेब फॅन क्लब म्हणतो तर मी देखील त्याला अहमदशहा अब्दाली म्हणणार. तो अहमदशहा अब्दालीच आहे. त्याला घाबरायचे कारण नाही. ज्या पद्धतीनं औरंगजेबाची इथे कबर बांधली तशी भाजपची राजकीय कबर बांधा...
Devendra Fadanvis On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम; ठाकरेंवर टीका
हे ही वाचा :