अयोध्येतील कारसेवेला फडणवीस होते का? उपमुख्यमंत्र्यांनी थेट दाखवला पुरावा, म्हणाले...
अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती तेव्हाचा फोटो देवेंद्र फडणवीसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला
मुंबई : अयोध्येतील (Ayodhya) राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपला जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती तेव्हाचा फोटो देवेंद्र फडणवीसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दैनिक नवभारत’नं हा फोटो पाठवला होता. फडणवीसांनी तोच फोटो आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे.
जुनी आठवण...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2024
नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र.
छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत… pic.twitter.com/v3NFbCSY1v
देवेंद्र फडणवीस - ठाकरे गटाचे वर्षभरापासून शाब्दिक युद्ध
अयोध्येतील कारसेवेवरून सध्या वातावरण चांगलंच तापलयं. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती बाबरी पाडण्यावरुन देवेंद्र फडणवीस - ठाकरे गटाच वर्षभरापासून शाब्दिक युद्ध रंगले होते. बाबरी मशिद पडली तेव्हा मी तिथेच होतो, उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक जे आज विधाने करत आहेत, त्यावेळी तिथे कोणीच नव्हते. सर्वजण घरात गुपचूप बसले होते. आज हे लोक राजकीय वक्तव्य करत आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकारही नाही. तिथे कोणीच नव्हते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी टोला लगावला होता. फडणवीसांच्या वजनानेच बाबरी पडली, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीसांनी फोटो शेअर करत ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला गेले असतील'
'देवेंद्र फडणवीस लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला गेले असतील', असे म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला गेले असतील.
हे ही वाचा:
Ram Mandir : प्रभू श्रीरामाला 114 कलशांच्या पाण्याने स्नान, रामललाच्या मंडपाची पूजा