एक्स्प्लोर

केंद्राचे नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे, काही लोकांची भूमिका दुटप्पी: देवेंद्र फडणवीस

गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे जेवढे निर्णय घेतलेत तेवढे निर्णय याआधी कधीही झाले नव्हते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

पुणे: केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच करण्यात आले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते मांजरी बुद्रुक या ठिकाणी आयोजित भाजपच्या शेतकरी संवाद मेळाव्याला संबोधित करत होते. या प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह इतर भाजप नेते उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोकं या कृषी कायद्याच्या संदर्भात दुटप्पी भूमिका घेतायत. महाराष्ट्रात कंत्राटी शेतीचा कायदा 2006 साली करण्यात आला आहे. या कायद्यामुळे कोणाची शेती हिसकावून घेतली गेली असं झालेलं नाही. राज्य सरकारच्या या कायद्यानुसार शेतकरी दाद मागण्यासाठी न्यायालयात जाऊ शकत नाही. मात्र केंद्राच्या नव्या कायद्यानुसार शेतकरी न्यायालयात दाद मागू शकतो.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी मदत केल्याचं सांगत देवेद्र फडणवीस म्हणाले की, मोदी सरकारने साखरेसाठी एमएसपी नक्की केला. त्यांनी साखर उद्योगासाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतुद केली आहे. मागील पाच वर्षात उसासाठी आणि साखरेसाठी जेवढे निर्णय झालेत तेवढे निर्णय या आधी कधीही झाले नव्हते.

राजा उदार नाही तर उधार राज्य सरकारवर टीका करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिवृष्टीमुळं राज्यातील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देऊ असं मुख्यमंत्री म्हणाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार त्याही पुढं जाऊन हेक्टरी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देऊ असं म्हणाले होते. मात्र शेतकऱ्यांना मदत न करता त्यांच्या हाती भोपळा आला. राजा उदार नाही तर उधार झाला. केळी उत्पादकांना अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही.

राज्य सरकारची दिरंगाई राज्य सरकारकडून मेमोरंडम केंद्र सरकारकडे गेल्यानंतरच केंद्रीय पथक तपासणीसाठी येत असतं. राज्य सरकारने मेमोरंडम उशीरा पाठवला. त्यामुळे केंद्रीय पथक नुकसानीची पाहणी करण्यासाठी उशीरा आलं आहे. मात्र केंद्रीय पथक योग्य तोच अहवाल देईल असं मत देवेद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च राज्य सरकारच्या तिजोरीत मंत्र्यांच्या बंगल्यावर नव्वद नव्वद कोटी रुपये खर्च करायला पैसे आहेत, दारुची अनुज्ञप्ती द्यायला पैसे आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे नागरिकांच्यासाठी पैसे नाहीत असं सागणं बंद करावं असंही देवेद्र फडणवीस म्हणाले.

पहा व्हिडिओ: Devendra Fadnavis : कृषी कायद्यासंदर्भात काही लोकांची दुटप्पी भूमिका : देवेंद्र फडणवीस

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 January 2025Suresh Dhas PC : संतोष देशमुखांचे आरोपी फासावर जातील तेव्हाच समाज शांत  होईल- सुरेश धसJitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Embed widget