एक्स्प्लोर
ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : देवेंद्र फडणवीस
राज्यातील शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत केली जाईल, अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र सरकारने ती केली नाही. त्यामुळे शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
पुणे : आमच्या जाहीरनाम्यात कधीच संपूर्ण कर्जमाफी घोषणा केली नव्हती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी करू असे सांगितले होते. म्हणून मी म्हटलं तोंडाला पाणी पुसले, अशी सरकार जास्त काळ टिकणारी नाहीत. राज्यातील शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत केली जाईल, अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र सरकारने ती केली नाही. त्यामुळे शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते. महाविकासआघडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराविषयी फडणवीस म्हणाले, नव्या सरकारमधील मंत्री मंडळ विस्ताराला एवढा वेळ का लागतो ते कळत नाही. नव्या सरकारचे पाहिले अधिवेशन, नवे मंत्री, खातेवाटप, प्रश्नांची उत्तरे असे काहीच नसल्याने अधिवेशनाची केवळ औपचारिकता पार पडली आहे.
नागरिकत्व विरोधी कायद्याविरोधात होणाऱ्या आंदोलनाविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात सीएए आणि एनआरसी हा वाद शंभर टक्के राजकीय हेतूने प्रेरित केलेला असून अल्पसंख्याकांच्या माथी भडकविण्याचे प्रयत्न केले जात आहे. यामुळे कोणाचीही नागरिकता काढून घेतली जाणार नाही, तर दिली जाणार आहे.
Devendra Fadnavis | 'हे' उद्दव ठाकरे याआधी पाहिलेले नाहीत : देवेंद्र फडणवीस | ABP Majha
फडणवीस म्हणाले, कॅग बाबतचा आरोप हासण्यासारखा आहे. यावर जयंत पाटील यांनीही याबाबत खुलासा दिला आहे की, अकाउंट सिस्टीम मध्ये दोष आहे. भ्रष्टाचार झाला नाही. सभागृहात 2009 पासूनची प्रकरणे दाखवली आहेत. 66 कोटी रक्कम दाखवली आहे.
अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमृता फडणवीस हे वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचं मत त्या मांडू शकतात. त्यामुळे त्यासंदर्भात त्याच सांगतील. मात्र त्या राजकारणात येणार नाहीत
लोकांचा प्रचंड विश्वास व प्रेम मिळवलं यात बऱ्याच गोष्टी गमावल्या. पाच वर्षात सुट्टी नाही,पारिवारिक सर्व गमावलं मुलीला खेळायला घेऊन जाण, सिनेमाला घेऊन जाण,मित्रांना भेटणं सर्व गमावलं. पण लोकांच प्रेम आणि विश्वास कमावला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement