एक्स्प्लोर

वारीसंदर्भात अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर

Devendra Fadnavis on Abu Azmi : आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis on Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वारीमुळं रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही असे वक्तव्य आझमी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे. वादग्रस्त विधान केले की प्रसिद्धी मिळते असे त्यानं वाटते. त्यामुळं अबू आझमी यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नसल्यामुळं त्यांच्या फालतू वक्तव्याला उत्तर देणार नाही असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयात असलेल्या हैदराबाद हाऊस मध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रस्ते विकासावर बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री गिरीश महाजन, मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते .

कुंभ मेळाव्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोड नेटवर्क तयार करण्यासाठी ही विनंती केली होती. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी बैठक घेत प्रमुख आठ रस्ते बनवण्याचा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजीनगर ते नाशिक नागपूर ते नाशिक, नाशिकला जोडणाऱ्या सगळ्या रस्त्यांसंदर्भात तसेच अंतर्गत रस्त्या संदर्भात बैठक पार पडली. या सगळ्या रस्त्यांना मान्यता निधी उपलब्ध करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल असे फडणवीस म्हणाले. कुंभमेळ्याच्या काळात जे काय ट्रॅफीक उपस्थित होणार आहे. त्याचाही मार्ग, द्वारका सर्कल सुद्धा दोन फेज केला जाणार आहे. पहिल्या फेजमध्ये कुंभ सुरु होण्यापूर्वी केला जाईल. तर दुसऱ्या फेजमध्येही काम केले जाणार आहे. नाशिक आणि त्रंबक हा रस्ता जोडला जाणार आहे. काही ठिकाणी सहा पदरी तर काही ठिकाणी चार पदरी यांचा रोडला मान्यता दिली आहे.

राहुल गांधींना मेक इन इंडिया माहित नाही

नागपूरच्या विविध प्रकल्पांच्या संदर्भातही आढावा घेतल्याचे फडणवीस म्हणाले. नाग नदीवर एसटीपी करण्याचा अनुषंगाने अंडरग्राउंड वीज, वाहन तळासाठी शहराबाहेर वाहनतळ सगळ्या विषयावर चर्चा झाल्याचे फडणवीस म्हणाले. राहुल गांधी यांना देशात काय बनते हे माहीत नाही. मेक इन इंडिया राहुल गांधी यांना माहित नाही. जोपर्यंत कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा भारताची अर्थव्यवस्था ही अकरावी अर्थव्यवस्था होती. मागील दहा ववर्षात भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवली आहे. राहुल गांधी यांनी याचा होमवर्क करावा असेही फडणवीस म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही; अबू आझमींच्या वक्तव्याने नवा वाद

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget