एक्स्प्लोर
मी केवळ छत्रपतींचा सेवक, फडणवीसांचं पवारांना उत्तर

कोल्हापूर : मी छत्रपतींचा केवळ सेवक आहे, संभाजी राजेंची राज्यसभेवरील नियुक्ती ही राष्ट्रपतींनीच केली, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिलं आहे. शनिवारी पवारांनी केलेल्या मिश्कील टिपणीवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्यसभेवरील निवडीबाबत पवारांना विचारणा केली, त्यावर सुरुवातीला या निवडीकडे राजकीय दृष्टीकोनातून बघण्याची गरज नाही, असं मत पवारांनी व्यक्त केलं. मात्र त्यानंतर इतिहासाचा दाखलाही त्यांनी दिला. यावेळी पहिल्यांदाच फडणवीसांकडून छत्रपतींची निवड झालीय, असंही मिश्किलपणे ते म्हणाले. पेशव्यांची छत्रपतींनी नियुक्ती केली होती. आज पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केली, असं पवार म्हणाले. त्यामुळे पवारांचं हे विधान मिश्किल असलं तरी त्याची खमंग चर्चा झाली. यावर उत्तर देताना मी छत्रपतींचा केवळ सेवक आहे, राज्यसभेवरील नियुक्ती ही राष्ट्रपतींनीच केली, असं फडणवीस म्हणाले. संभाजीराजे यांची खासदारकी हा विचारांचं सन्मान आहे. कोल्हापुरात झालेल्या शेतकरी मेळाव्यानिमित्त फडणवीस बोलत होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























