Delhi-NCR Pollution: दिल्ली आणि परिसरातील प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, लॉकडाऊनसारख्या पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला
Delhi-NCR Pollution : कोरोना संकटात दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढली आहे. दिल्लीत काल हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 462 इतका नोंदवला गेला.
Delhi-NCR Pollution : दिल्ली आणि परिसरातील प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केलीय. यावेळी लॉकडाऊनसारख्या पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिलाय. त्याचबरोबर दोन ते तीन दिवसांत परिस्थिती सुधारण्यासाठी निर्णय घेण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत.
कोरोना संकटात दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढली आहे. दिल्लीत काल हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 462 इतका नोंदवला गेला. हाच निर्देशांक आज 550 इतका होण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसांत प्रदूषणाची पातळी आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होतेय. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक सहाशेपार जाण्याची शक्यता आहे. वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी इथले नागरिक करतायत. त्यातच पंजाब, हरियाणात पराली जाळल्याने प्रदूषणाचा धोका वाढत असल्याचं बोललं जातंय
आज चीफ जस्टीस एन वी रमना, जस्टि, डी वाय चंद्रचूड आणि जस्टिस सूर्यंकात यांनी सुनवाणी केली. सुनवाणीत केंद्र सरकारने सांगितले की, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. पंजाबमध्ये कडक नियम करावे लागणार आहे. पराली जाळणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. न्यायाधिशांना केंद्र सरकारची ही गोष्ट आवडले नाही. चीफ जस्टिस म्हणाले, तुम्ही शेतकऱ्यांना दोषी ठरवणार आहात का? 70 टक्के प्रदूषण शेतकऱ्यांमुळे नाही तर इतर कारणांमुळे वाढले आहे. सरकार परालीपासून सुटका मिळण्यासाठी दोन लाखाचे यंत्र खरेदी करणार आहे. पण या यंत्राची किंमत काय आहे? याचा विचार केला पाहिजे.
चीफ जस्टिस म्हणाले, सध्या दिल्लीतील प्रदुषणासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. पुढील दोन- तीन दिवसात परिस्थिती सुधारली पाहिजे. AQI चा स्तर 500 वर गेला आहे तो नियंत्रणात आला पाहिजे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जर दिल्लीत लॉकडाऊन लावण्याची गरज पडली तर त्यावर देखील विचार केला पाहिजे.
संबंधित बातम्या :
Mumbai Pollution : मुंबई दिवाळीतील ध्वनी प्रदूषणाच्या पातळीत यंदा किंचीत घट
जगातील 50 टक्के प्रदूषण आणि तापमान वाढीसाठी फक्त 'हे' पाच देश जबाबदार! भारताचाही समावेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha