एक्स्प्लोर

Raj Thackeray Hate Speech Case: राज ठाकरेंना दिलासा; बोकारो कोर्टाचं भडकावू भाषणासंदर्भातलं समन्स दिल्ली हायकोर्टाकडून रद्द

Raj Thackeray Hate Speech Case: 2008 सालच्या एका प्रकरणात भडकावू भाषण केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना झारखंडमधील बोकारो कोर्टानं समन्स बजावलं होतं.

Raj Thackeray Hate Speech Case: दिल्ली हायकोर्टाकडून (Delhi High Court) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दिलासा दिला आहे. 2008 सालच्या एका प्रकरणात बोकारो कोर्टानं राज ठाकरेंना समन्स बजावलं होतं. याप्रकरणी सुनावणी दरम्यान दिल्ली हायकोर्टानं समन्स रद्द केलं आहे. 

दिल्ली हायकोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलासा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कथित भडकाऊ भाषण केल्याबद्दल झारखंडच्या बोकारो कोर्टानं बजावलेलं समन्स दिल्ली उच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठानं यासंदर्भात निर्णय दिला. विश्वास आणि धर्माबाबत बोलताना अधिक सावधगिरी बाळगावी लागते. त्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या विचारांना धक्का लावता येत नाही, किंवा चिथावणी दिली जाऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. 

भारताची एकता विविध धर्म, धर्म आणि भाषा यांच्या सहअस्तित्वात आहे आणि ते शतकानुशतकं टिकून राहील, असं मत न्यायालयानं सुनावणी दरम्यान व्यक्त केलं आहे.  यासोबतच खून, दंगल आणि भडकावू भाषण प्रकरणी धनबाद न्यायालयानं जारी केलेले समन्स न्यायालयाने दुसऱ्या एका आदेशात रद्द केले. न्यायालयाने 13 मार्च रोजी हा आदेश दिला होता, जो गुरुवारी जारी करण्यात आला. 

2008 मध्ये झारखंडमधील बोकारो कोर्टानं बजावलेलं समन्स केंद्र किंवा झारखंड सरकारच्या पूर्वपरवानगीअभावी कायम ठेवता येणार नाहीत, असं न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान, न्यायालयानं ठाकरे यांच्याविरुद्ध कलम 153अ अन्वये दाखल केलेली फौजदारी तक्रार रद्द करण्यास नकार दिला. हे संपूर्ण प्रकरण राज ठाकरे यांनी 2008 साली दिलेल्या भाषणाशी संबंधित आहे. त्यात ठाकरे यांनी बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात साजऱ्या होणाऱ्या छठपूजेवर निशाणा साधला होता. उत्तर भारतीयांचा छटपूजा हा सण म्हणजे, नाटक आहे, असं राज ठाकरे 2008 साली एका भाषणात म्हणाले होते. त्याविरोधात झारखंडच्या बोकारोमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.  

छठ पूजा हा हिंदूंचा सण आहे आणि तो विशेषतः बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये साजरा केला जातो. उच्च न्यायालयात ठाकरे यांची बाजू ज्येष्ठ वकील अरुणाभ चौधरी आणि अनुपम लाल दास यांनी मांडली. या कथित वक्तव्याशी संबंधित अनेक प्रकरणे नंतर सर्वोच्च न्यायालयानं विविध राज्यांतून दिल्लीतील न्यायालयाकडे वर्ग केली होती. उत्सवावरील टिप्पणीबद्दल इतर सहा तक्रारींमध्ये ठाकरे यांना बजावलेले समन्स न्यायालयानं रद्द केलं आहे. परंतु तक्रारींमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP MajhaSthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Embed widget