एक्स्प्लोर

Deglur By Election LIVE : आज देगलूर बिलोली मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मतदान, पाहा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Nanded Deglur Biloli By Election : आज नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Key Events
Deglur By Election live updates Polling for Deglur Biloli constituency by-election today, battle of prestige for Congress-BJP subhash sabane jitesh antapurkar Deglur By Election LIVE : आज देगलूर बिलोली मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मतदान, पाहा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
nanded_election_03

Background

Nanded Deglur Biloli By Election : आज नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीनं देखील जोमानं प्रचार करुन निवडणुकीत रंगत आणली आहे. आज पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनानं देखील जय्यत तयारी केली आहे. देगलूर पोटनिवडणूक मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 677 अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. आज सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत होणार मतदान होणार आहे. 
 
ही निवडणूक सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने 1 हजार 648 कर्मचारी आणि 29 क्षेत्रिय अधिकारी यांची नेमणूक केली आहे असे देगलूर निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. या पोटनिवडणुकीत एकूण 12 उमेदवार निवडणूक रिंगणात असून आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात महाविकास आघाडी, भाजपा, वंचित आघाडी अशी प्रमुख लढत पाहण्यास मिळणार आहे. या मतदारसंघ पोटनिवडणुकीत काँग्रेस तथा महाविकास आघाडीकडून जितेश अंतापूरकर (jitesh antapurkar), भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष साबणे (Subhash Sabane) तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात आहेत.

2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना 89 हजार 400 मताधिक्य मिळाले मिळून विजयी झाले होते. त्याचप्रमाणे त्यावेळचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 560 तर वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार रामचंद्र भरांडे  यांना 13 हजार 300 मतदान पारड्यात पडले होते.  

या निवडणूकीत 412 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रीयेत 1 लाख 54 हजार 92 पुरुष मतदार, तर 1 लाख 44 हजार 256 स्त्री मतदार व इतर 5 आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदाराची संख्या 187 असून असे एकूण 2 लाख 98 हजार 540 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दिग्गजांच्या प्रचारसभा
ही पोटनिवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची ठरत आहे. निवडणुकीच्या आधी शिवसेनेत असलेले सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना प्रवेश केल्यानंतर उमेदवारीही मिळाली तर दुसरीकडे काँग्रेसनं दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना संधी दिली. या निवडणुकीत प्रचारासाठी दिग्गजांनी हजेरी लावली आणि विजयाचा दावा केला आहे. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्या अनेक दिग्गजांच्या सभा पार पडल्यात तर महाविकास आघाडीकडून मंत्री अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. वंचितकडून प्रकाश आंबेडकरांनी देखील सभा घेतल्या आहेत. 

16:56 PM (IST)  •  30 Oct 2021

देगलूर पोटनिवडणुकीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 48.47 टक्के मतदान    

आज सकाळी 7 ते  दुपारी  3 या दरम्यान मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. पुरुष मतदार 73  हजार 212 तर स्त्री मतदार 71 हजार 390 असे एकूण 1 लाख 44 हजार 602 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान पार पडलेली टक्केवारी 48.47 आहे.

13:54 PM (IST)  •  30 Oct 2021

नांदेडच्या देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत मतदान केंद्रावर गोंधळ, मतदार यादीत नावांतील चुकांच्या घोळामुळे वाद

देगलूर बिलोली मतदारसंघातील पोटनिवडणुकीचं मतदान सुरु आहे. एका मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थाटलेले तंबू काढून टाकण्याचे आवाहन पोलिसांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला. पोलिसांनी आवाहन केलं तरी कार्यकर्त्यांनी तंबू काढण्यास नकार दिला. केवळ भाजपचेच तंबू काढले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अभिजितचा पलटवार
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या 'अराजकतावादी' टीकेवर अभिजितचा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
Nashik Vidhan Parishad Election 2026: 'माघार घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही'; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ
'माघार घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही'; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
India vs Afghanistan: अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अभिजितचा पलटवार
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या 'अराजकतावादी' टीकेवर अभिजितचा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
Embed widget