एक्स्प्लोर
भोजने महाराजांच्या पालखीसोबत हरीणही पंढरीच्या वाटेवर

बुलडाणा : हा विठुराया फक्त माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही तितकाच आपलासा वाटतो. याचाच प्रत्यय भोजने महाराजांच्या पालखीत आला. इथं चक्क एक हरीण वारीसोबत प्रवास करत आहे. बुलडाण्यातील खामगाव तालुक्यातील अटाळी येथील भोजने महाराजांच्या पालखीसोबत हे हरीण चालत आहे. वारी जशी चालते तसं हे हरीणही वारीसोबत प्रवास करतं. जिथे वारी थांबते तिथं हे हरीणही विश्राम करतं. पोटाची भूक भागवतं आणि पुन्हा सकाळी वारीबरोबर प्रवास करतं.
आणखी वाचा























