Kolhapur | दख्खनचा राजा जोतिबाचे खेटे स्थगित, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, मंदिरात प्रवेश बंदी
परंपरेप्रमाणे दरवर्षी पाच रविवारी जोतिबाचे खेटे होत असतात. यावेळी कोरोनामुळे ते रद्द करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

कोल्हापूर: दख्खनचा राजा जोतिबाचे खेटे स्थगित करण्याचे आदेश दिल्यानंतर आज जोतिबा डोंगरावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. दख्खनचा राजा जोतिबाचे आज पासून खेटे सुरू होत आहेत. पुढचे चार रविवार हे खेटे आयोजित करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या संकटामध्ये हे खेटे आयोजित करू नये अशा पद्धतीचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले होते. त्यामुळे जोतिबा डोंगरावर येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिसांची करडी नजर आहे.
जोतिबा देवाच्या खेट्यांसाठी महाराष्ट्रातूनच नाही तर इतर राज्यातून देखील मोठ्या संख्येने भाविक येत असतात. खासकरून कर्नाटक राज्यातील भाविक जोतिबाच्या खेट्यासाठी येतात. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जोतिबा डोंगरावर यंदा खेटे आयोजित करू नयेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन काटेकोरपणे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
Kolhapur | जेवणामध्ये सापडली पाल, जाब विचारल्याच्या रागातून हॉटेल व्यवस्थापनाकडून जबर मारहाण
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दोनच दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला याबाबत सूचना केल्या होत्या. खेट्यांच्या निमित्ताने कोणतेही भाविक मंदिरात येऊ नयेत यासाठी देवस्थान समितीने आज जोतिबाच्या मंदिरामध्ये प्रवेश बंद केला आहे.
जोतिबा डोंगरावर येण्यासाठी दोन ते तीन मार्ग आहेत. खेट्यांसाठी बंदी घालण्यात आली असली तरी भाविक कोणत्या ना कोणत्या मार्गावर मार्गाने डोंगरावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळेच पोलिसांनी या सर्व मार्गांवर आपला बंदोबस्त तैनात केला आहे. पुढचे चारही रविवार अशाच पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त जोतिबा डोंगराच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
नाही तटत, नाही अडत, एव्हरी बडी से खच्याक, विषय संपला! कोल्हापुरातील खच्याक मामाने घेतला जगाचा निरोप
























