एक्स्प्लोर

Kolhapur | जेवणामध्ये सापडली पाल, जाब विचारल्याच्या रागातून हॉटेल व्यवस्थापनाकडून जबर मारहाण

कोल्हापूरातील एका हॉटेलमध्ये जेवणामध्ये पाल सापडली. त्याचा जाब विचारल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाकडून संबंधित तरुणांना जबर मारहाण केल्याचा प्रकार घडलाय.

कोल्हापूर: शहरात जेवणामध्ये मेलेली पाल सापडल्यावर त्याचा जाब विचारणाऱ्या तरुणांना एका हॉटेलमध्ये जबर मारहाण करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला. यामुळे खवय्यांचे शहर म्हणून ओळखणाऱ्या कोल्हापुरात एकच खळबळ उडाली.

याबाबत जखमी तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास ते जेवणासाठी राजेंद्रनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ मागवले. त्यामधील शाकाहारी पदार्थात मेलेली पाल सापडली. याबाबत हॉटेल व्यवस्थापकाला त्या तरुणांनी जाब विचारायला सुरुवात केली.

नाही तटत, नाही अडत, एव्हरी बडी से खच्याक, विषय संपला! कोल्हापुरातील खच्याक मामाने घेतला जगाचा निरोप

हा सगळा शाब्दिक वाद सुरू असताना काही तरुणांनी त्याचे व्हिडिओ शूटिंग केले. त्याचाच राग आल्याने हॉटेलमधील व्यवस्थापक, तेथील बाऊन्सर त्याचबरोबर वेटर यांनी त्या तरुणांना बेदम मारहाण केल्याचं सांगण्यात येतंय. या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेनंतर जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी केली. तरुणांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूचे संबंधित व्यक्ती राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये ठाण मारून बसले होते.

संबंधित हॉटेलमधील मेलेल्या पालीचा व्हिडिओ बघता-बघता कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तरुणांच्या मोबाईलवर व्हायरल झालाय. शेवटी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या नागरिकांनी कोणतीही तक्रार न देता सामंजस्यपणे हा वाद मिटवला.

In Pics: कोल्हापूरातील कागल तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget