एक्स्प्लोर
लेकीवर बलात्कार, मायलेकीच्या हत्येप्रकरणी दोघांना फाशी

बीड : मायलेकीच्या दुहेरी हत्याकांड आणि मुलीवरील बलात्कार प्रकरणी दोन आरोपींना मरेपर्यंत फाशी ठोठावण्यात आली आहे. बीडमधील धारुर तालुक्यात गेल्या वर्षी ही थरकाप उडवणारी घटना घडली होती. आरोपी कृष्णा रामराव रिडडे आणि अच्युत उर्फ बप्पा उर्फ बाबु कचरु चुंचे या दोघांना माजलगांव येथील सत्र न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांनी दोषी ठरवलं आहे. चोरंबामध्ये 28 मे 2015 रोजी 45 वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली होती, तर तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचाही गळा दाबून निर्घृणपणे खून केला होता. या प्रकरणी 29 तारखेला धारुर पोलिसात कलम 449, 354 ब, 376(2)(आय), 302 सह कलम 34 भादंवि आणि कलम 4 अन्वये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवून 16 ऑगस्ट रोजी दोघांवरील आरोप सबळ पुराव्यानिशी सिद्ध झाले.
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















