एक्स्प्लोर
मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे सासरच्यांनी सुनेला अंधारात डांबलं
अमरावती : मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला वर्षभर अंधार कोठडीत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे.
अमरावतीच्या जिल्ह्यातील कुऱ्हा गावातील जयश्री कुराडे हिचं माहूर गावातल्या सुरेश दुधे यांच्याशी लग्न झालं होतं. तीन वर्षांपूर्वी सुरेश दुधे कुऱ्हा म्हणजे आपल्या सासरी काही कामानिमित्त आले होते. तिथून यवतमाळला परतताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
ही दुर्घटना जयश्रीच्या घरातल्या (माहेरच्या) लोकांमुळेच झाली, असा आरोप सासरच्या मंडळींनी केला. तेव्हापासून सासरच्यांनी छळ सुरु केल्याचा आरोप जयश्री कुराडे हिनं केला आहे.
छळामागे पतीच्या नावे असलेल्या 13 एकर जमिनीचा हव्यासही कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी सासरच्या मंडळींची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement