एक्स्प्लोर

लॉकडाऊनमुळे कोकणातील 'दशावतारी राजा' चिंतेत, शेकडो नाट्यप्रयोग रद्द झाल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ

लॉकडाऊनमुळे कोकणातील दशावतारी राजा चिंतेत आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे शेकडो नाट्यप्रयोग रद्द झाल्याने या लोककलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सिंधुदुर्ग : 800 वर्षांपेक्षा जास्त काळापासून जतन केलेली दशावतार लोककला अडचणी आली आहे. कोकणातील या दशावतार लोककला कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही अडचणीत सापडली आहे. कोकणातील दशावतारी राजा आता हतबल झाला आहे. दशावतार कलाकार आणि चालक मालक यांचा प्रमुख हंगाम असतो. त्यावेळी राज्यात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने शेकडो नाट्यप्रयोग रद्द झाल्याने दशावतारी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे आता जगायचं कसं असा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे.

सुधीर कलिंगण प्रसूत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळचे मालक सुधीर कलिंगण यांना सलग दोन वर्षे कोरोनामुळे नाट्यप्रयोग रद्द झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या वर्षीचा संपूर्ण सिझन कोरोना मुळे वाया गेला. त्यामुळे दशावतार लोककलावंताना हलाखीचं जीवन जगाव लागलं. चालक मालकांना नव्हे तर संपूर्ण कलाकारांवर महाभयंकर संकट आलं आणि त्या संकटाला आम्ही कसेबसे तोंड देण्याचे कार्य केलं. पण आम्ही आता एवढ्या हलाखीच्या परिस्थितीत आहोत की आता जगावं कसं असा यक्ष प्रश्न आमच्यासमोर पडला आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आणि 144 कलम लागू केलं. त्यामुळे आता आम्ही राज्यात कुठेही नाट्यप्रयोग सादर करू शकत नाही. नाट्यप्रयोग सादर केलेले नसतील तर आमच्या कलाकार आम्ही मालक म्हणून आगाऊ रक्कम देतो, ती आगाऊ रक्कम आमच्याकडे त्या पद्धतीने पुन्हा वसुली होणार नाही. 

किंबहुना आम्ही चालक मालकांनी गाड्या घेतल्या, त्या गाड्या बँकेचे लोन काढून घेतलेले आहेत. त्यामुळे त्या गाड्यांचे हप्ते, गाड्यांचा मेंटेनन्स चालक मालकांना बघावा लागतो. तसेच गाड्यांचा टॅक्स, व्यावसाय कर असा प्रचंड खर्च असतो. त्यामुळे हे सगळे खर्च आमच्या व्यवसायावर अवलंबून असतात. ही दशावतार लोककला अशीच ठप्प राहिली तर जगावं कसं असा यक्ष प्रश्न कलाकारांना पडला आहे. सरकारचे नियम नक्कीच आम्हाला बंधनकारक आहेत. पण त्या अनुषंगाने आम्ही जर चालक मालक आणि दशावतारी लोककलाकार गेलो तर दशावतार लोककला आणि आमचे संसार सांभाळणारे कसे असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

वर्षाला 200 ते 250 दशावतार नाटकाचे प्रयोग करत असतो. नोव्हेंबर ते मे अखेर पर्यंत आमचा सिझन असतो. पावसाळा सुरू झाला की दशावतार लोककलेला कोणीही विचारत नाही. दशावतार चालक मालकासमोर कलाकारांना दिलेले पैसे हे नाट्य प्रयोग करून वसूल करायचे असतात. मात्र, नाट्यप्रयोग रद्द झाले तर आमचे पैसे वसूल करायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात हे पैसे अगोदर दिलेले असल्याने ते कलाकार आपआपल्याला पध्दतीने खर्च करून मोकळे झालेले असतात. त्यामुळे चालक मालक आणि कलाकार यांच्यासमोर हे पैसे फेडायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. बरेच कलाकार हे जेव्हा दशावतार लोककला सादर करणार तेव्हाच त्यांचा उदरनिर्वाह करणार होणार असे कलाकार आहेत. तसेच पुढच्या वर्षी हे कलाकार नाट्य मंडळात पाहिजे असल्यास त्यांना आगाऊ रक्कम दिल्याशिवाय पर्याय नसतो. त्यांना ही रक्कम पावसाळ्यात द्यावी लागते. ते पावसाळ्यात ही आगाऊ रक्कम घेऊन आपलं घर चालवतात. आम्ही मंडळाचे मालक मात्र बँकेचं कर्ज किंवा कुणाकडून उसने घेऊन या कलाकारांना हे पैसे देत असतो. 

दशावतार की लोककला असून कोकणचीचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा हा प्राण आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देश विदेशात आम्ही ही लोककला सादर केली आहे. अश्या लोककलेकडे सरकार जर ढुंकूनही पाहणार नसेल तर ही दशावतार लोककलेची शोकांतिका आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशावतार नाट्य मंडळ 100 हुन जास्त आहेत. त्यातील काही मंडळ ही दरवर्षी 200 ते 250 नाट्यप्रयोग सादर करतात. त्यामुळे लॉकडाऊन झाल्याने या दशावतार मंडळाना त्याची झळ पोहोचली आहे की आता जगायचं कस? दशावतार लोककलेला लोकाश्रय मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राजाश्रय मुळीच नाही. राजाश्रय मिळावा यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न केले. आम्हाला त्यात यश मिळालं नाही. हेच आमच्या लोककलेचं दुर्दैव आहे. इतर लोककलेना सरकारकडून प्राधान्य आहे. तसं प्राधान्य दशावतार लोककलेला मुळीच नाही. 

कोकणातील दशावतार लोककला ही मनोरंजनच नाही तर समाजप्रबोधन सुद्धा करते. ही एक हिंदू धर्माची संस्कृती आहे. आम्ही मात्र हिंदू धर्माची संस्कृती जपत असताना सरकार मात्र आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. बाबी नालंग, बाबी कलिंगण अश्या अनेक दिगग्ज कलाकारांनी दशावतार लोककला सातासमुद्रापार नेली. मात्र सरकार आमच्याकडे दुर्लक्ष का करत हेच आम्हा कलावंतांना कळत नाही. 

800 वर्षांपेक्षा जास्त काळाचा लोककलेला वारसा लाभलेली ही दशावतार लोककला आहे. ती लोककला सिंधुदुर्गातील तळागाळातील लोककलाकार तडफडीने जपतात, लोकांसमोर सादर करून समाजप्रबोधन करतात, लोककला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता कलाकारांचं जगला नाही तर ही कला जगणार कशी हा प्रश्न आम्हा कलाकारांसमोर उभा आहे.

हातावर पोट असलेल्यांना, रिक्षावाल्यांना अशांना सरकारने पॅकेज जाहीर केलं. मात्र, आमच्यासारख्या लोककलेला सरकार दुर्लक्षित का करत हाच प्रश्न उभा राहतो. कोकणातील जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत. ज्यांना आम्ही आमचे समजून आमचं बहुमूल्य मत देऊन कोणतीही अपेक्षा न करता आम्ही त्यांना निवडूण देतो. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असतो की आमच्या कोकणातील लोकप्रतिनिधी आमच्या लोककलेसाठी काहीतरी करतील, आम्हाला न्याय मिळवून देतील. नुसती आम्हाला लोकाश्रय मिळून काही होणार नाही, आम्हाला राजाश्रयाची नित्तांत गरज आहे. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं अन्यथा आम्ही कलाकार टोकाची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही.

दरवर्षी नवीन दशावतार कंपनीत काम करतो. त्यावेळी दशावतार कंपनीच्या मालकांकडून आगाऊ पैसे घेतो. ते पैसे अगोदरच घेतलेले असतात. त्यात आता लॉकडाऊन असल्याने नाट्य प्रयोग रद्द झालेत. त्यामुळे सध्या हाताला काम नाही. हाताला काम नसल्याने पैसे नाहीत. वयाच्या 12 व्या वर्षांपासून डोक्यावर बोजा घेऊन ही दशावतार लोककला लोकांसमोर सादर करून टिकवली आहे. आता कोरोनामुळे सगळं बंद झालं हे दुसर वर्ष आहे. आता आम्ही जगायचं कस. आता आमच्या समोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही. शासनाने आमच्याकडे लक्ष देण गरजेचे आहे. आमचं हातावरच पोट आहे. जर दशावतार नाटक बंद झाली तर आम्ही कमवणार कुठे आणि खाणार काय. उपासमारीची वेळ दशावतार लोककलाकारांवर आली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget