एक्स्प्लोर
अॅट्रॉसिटीच्या समर्थनासाठी बीडमध्ये दलित ऐक्य मोर्चा
बीड : कोपर्डीप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अॅट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित ऐक्य मूक मोर्चा धडकणार आहे. अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त अन्याय-अत्याचाराविरुद्ध पहिल्यांदाच एकवटले असून विराट गर्दी पाहायला मिळत आहे.
या मोर्चासाठी दलित ऐक्याची महिनाभरापासून मोर्चे बांधणी सुरु होती. यासाठी वाड्या, वस्त्या, तांड्यांवर व तालुका, शहरस्तरावर बैठका झाल्या. या मोर्चात सामान्य महिला व महाविद्यालयीन विद्यार्थीनी मोर्चाच्या अग्रभागी आहेत.
दलित, आदिवासी व भटके विमुक्त समाज बांधव पहिल्यांदाच निळ्या झेंड्याखाली एकत्रित येत आहेत. विविध जातींचे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून या मोर्चासाठी पांढऱ्या रंगाचा ‘ड्रेस कोड’ करण्यात आला आहे. त्यामुळे मोर्चात शिस्तीचे दर्शन घडत आहे. मोर्चाच्या अनुषंगाने धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक गढी, मांजरसुंबा येथून वळवली आहे.
शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. दीड हजारावर पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असून त्यांच्या सोबत पाच हजार स्वयंसेवकही नेमण्यात आले आहेत.मोर्चाच्या पाठीमागे लगेचच स्वच्छतेसाठी स्वयंसेवक कार्यरत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement