एक्स्प्लोर

धक्कादायक! रेल्वे रुळावर सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न, लोको पायलटच्या सतर्कतेमुळं अनर्थ टळला

उरूळी कांचन  इथं आज एक धक्कादायक घटना घडली आहे. गॅसने भरलेले सिलेंडर रेल्वेच्या‌ रुळावर ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. उरुळी कांचनच्या हद्दीत रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

Cylinder on railway tracks : उरूळी कांचन  इथं आज एक धक्कादायक घटना घडली आहे. गॅसने भरलेले सिलेंडर रेल्वेच्या‌ रुळावर ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. उरुळी कांचनच्या हद्दीत काल (ता.29) रात्री पावणे 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकणी उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अज्ञात व्यक्तीचा घातपात घडविण्याचा कट

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे व रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट देवून तपासाच्या व सुरक्षेच्या दृष्टीने सूचना केल्या.याप्रकरणी रेल्वेचे लोको पायलट शरद शहाजी वाळके, (वय 38 ) यांनी फिर्याद दिली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलट शरद वाळके हे नेहमीनुसार रविवारी (ता.29) रात्री आपल्या हद्दीतील रेल्वे मार्गाची पाहणी करत होते. त्यांना रात्री पावणे अकराच्या‌ सुमारास उरूळी कांचनच्या हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर (रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नंबर 219/7-5) प्रिया गोल्ड कंपनी गॅसचा सिलेंडर आढळला. त्यांनी ते सिलेंडर उचलण्याचा प्रयत्न केला असता, सिलेंडरमध्ये गॅस (3900 किं ग्रॅम वजन) असल्याचे लक्षात आले. तत्काळ वाळके यांनी ते सिलेंडर रेल्वे रुळापासून दूर नेत अज्ञात व्यक्तीचा घातपात घडविण्याचा कट उधळून लावला. 

रूळी कांचन पोलिसांनी रेल्वेच्या कलम 150, 152 नुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

शरद वाळके यांनी या प्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना व वरीष्ठांना दिली. त्यानुसार उरूळी कांचन पोलिसांनी रेल्वेच्या कलम 150, 152 नुसार अज्ञात व्यक्तीवर घातपाताचा घडवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस,  उरुळी कांचन पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील  यांनी घटनास्थळास भेट दिली. अधिक तपास उरूळी कांचन पोलिस करत आहेत.

रात्री पावणे 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस

दरम्यान, रात्री पावणे 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान, या प्रकरणी पोलिस सतर्क झाले आहेत. या प्रकरणाचा तपास करत आहेत. अज्ञाताविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.  

महत्वाच्या बातम्या:

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा अपघात टळला, चिंचवड ते आकुर्डी स्थानकादरम्यान रुळावर रचले होते मोठे दगड

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
Embed widget