Curfew In Maharashtra | कृषिविषयक सर्व वाहतूक सुरू राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
LIVE
Background
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात कोरोना विषाणू जास्त पसरू नये म्हणून जिल्ह्याजिल्ह्यातील सीमाही बंद करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरुच राहणार आहेत.
काय काय सुरु राहणार?
- जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
- औषधांची दुकानं
- किराणाची दुकानं
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
- दवाखाने, रुग्णालयं
- बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था
- वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा यांसारखी अत्यावश्यक कार्यालयं
- रिक्षा, टॅक्सी सुरु (प्रवाशांची संख्या मर्यादित)
- कृषीमालाशी सबंधित वाहतूक
- रेल्वेतील मालवाहतूक
काय काय बंद राहणार?
- नागरिकांचा प्रवास
- मुंबईची लोकलसेवा
- जिल्ह्यांच्या सीमा
- राज्यातील सीमा
- परदेशातून येणारी वाहतूक
- धार्मिक प्रार्थना स्थळे
- खासगी वाहने (अत्यावश्यक कारणांसाठी सुरू राहतील)
- शाळा, महाविद्यालयं
- मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह
- जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळळता इतर दुकानं
यावरुनच अत्यावश्यक असणाऱ्या सेवा वगळता त्याव्यतिरिक्तच्या सर्व सेवा येत्या काळात बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
संबंधित बातम्या
Curfew in maharashtra | राज्यात संचारबंदी! काय सुरु राहणार आणि काय बंद?
coronavirus | सांगली जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रूग्ण