एक्स्प्लोर
Advertisement
CRPF जवान तान्हाजी नवले नक्षलवाद्यांशी लढताना शहीद
अहमदनगर/शिर्डीः अकोले तालुक्यातील सीआरपीएफ जवान तान्हाजी नवले (वय 38) यांना छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झुंज देताना वीरमरण आलं. काल सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली.
तान्हाजी नवले अकोले तालुक्यातील नवलेवाडीचे सुपुत्र आहेत. ते 1998 पासून सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडिल, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
तान्हाजी नवले यांच्या वीरमरणाच्या बातमीनंतर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. गावचा सुपूत्र नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाल्यामुळे नवलेवाडीत शोकाकूळ वातावरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
भारत
Advertisement