एक्स्प्लोर
सांस्कृतिक नगरीला गुन्हेगारीचा बट्टा, डोंबिवलीत गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ
डोंबिवली (ठाणे) : ‘सांस्कृतिक नगरी’ म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरात मागील वर्षभरात गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील दोन महिन्यांत डोंबिवलीत तीन हत्या झाल्या असून, या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरताना दिसत आहेत.
डोंबिवलीतल्या गेल्या वर्षभरातील गुन्ह्यांचा इतिहास :
- 4 एप्रिल 2017 – सुरेश मंचेकर टोळीचा गुंड विठ्ठल नवघरे याची चाकूने भोसकून हत्या
- 9 मे 2017 – ठाकुर्लीत घराच्या दुरुस्तीचं काम घेण्याच्या वादातून किशोर चौधरी आणि महिमादास विल्सन यांची हत्या
- 13 मे 2017 – मानपाड्यात कैऱ्या तोडण्याच्या वादातून पुतण्या जयेश म्हात्रे याने सख्खा काका गणपत म्हात्रे यांच्यावर केला गोळीबार
- 20 मे 2017 – नगरसेवक वामन म्हात्रे यांचा भाऊ बाळा म्हात्रे यांना घरात घुसून बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी
- 26 मे 2017 – दत्तनगर भागात डॉ. शिरीष जोशी यांच्यावर दोन तरुणांनी वार करून बंदूक दाखवत दिली जीवे मारण्याची धमकी
- 30 मे 2017 – आयरे गावात जागेच्या वादातून विक्रांत उर्फ बाळू केणे या तरुणाची गोळ्या झाडून हत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement