न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा असं कुठेही लिहिलेलं नाही : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil : न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा असं कुठेही लिहिलेलं नाही रात्री 10 ते सकाळीं 6 लावू नये असं लिहिलेलं आहे, असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे
Maharashtra Home Minister Dilip Walse Patil : न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा असं कुठेही लिहिलेलं नाही रात्री 10 ते सकाळीं 6 लावू नये असं लिहिलेलं आहे, असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना वळसे पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ज्यांना जी प्रार्थना करायची आहे ती घरात कारवी, मंदिरात कारवी, उगाचच सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. भाजपने केवळ धार्मिक भावना पूढे करून प्रचार केला परंतु त्याना लोकांनी नाकारलं आहे, असं वळसे पाटील म्हणाले. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यातील कायदा सूव्यवस्था यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहीती मिळतेय.
माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीतल विजयावरही भाष्य केले. कोल्हापूरचा विजय आम्हाला अपेक्षित होता आणखी मोठा विजय होणे अपेक्षित होतं, असे ते म्हणाले. भाजपने केवळ धार्मिक भावना पूढे करून प्रचार केला परंतु त्याना लोकांनी नाकारलं आहे, असे वळसेही वळसे पाटील म्हणाले.
ज्यांना जी प्रार्थना करायची आहे ती घरात कारवी मंदिरात कारवी उगाचच सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. न्यायालयीन निर्णयात भोंगे काढा असं कुठेही लिहिलेलं नाही रात्री 10 ते सकाळी 6 लावू नये असं लिहिलेलं आहे. महारष्ट्र पोलीस मुस्लिम संघटनासोबत बोलणं करतं आहे आणि त्यांना जे नियम आहेत त्याबाबत माहिती देण्यात येतं आहे. आमचं सर्व संघटनांसोबत बोलणं सुरू आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
जयश्री पाटील कुठे आहेत याचा शोध सुरु आहे. तसेच शरद पवार यांच्या घरी आलेल्या एकटी कर्मचाऱ्यांमध्ये मद्यपान करून आलेले एसटी कर्मचारी देखील होते. जयश्री पाटील कुठे आहेत याचा शोध सुरु आहे. तसेच शरद पवार यांच्या घरी आलेल्या एकटी कर्मचाऱ्यांमध्ये मद्यपान करून आलेले एसटी कर्मचारी देखील होते, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.