एक्स्प्लोर

सामूहिक बलात्कार प्रकरणी महिलेसह चौघांना 20 वर्षांची शिक्षा

पुण्यातील मुंढवा केशवनगर भागात नातेवाईकाकडे सुट्टीसाठी आलेल्या 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता.

पुणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी एका महिलेसह चौघांना पुणे सत्र न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. पुण्यातील मुंढवा केशवनगर भागात नातेवाईकाकडे सुट्टीसाठी आलेल्या 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. विशेष न्यायाधीश एस.के कऱ्हाळे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. महिलेला सामूहिक बलात्कार प्रकरणी शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रकरणी मुंडव्यातील सर्वोदय कॉलनीत राहणाऱ्या मनोज सुरेश जाधव, वर्षा धनराज गायकवाड ,अजय दिपक जाधव आणि खराडी येथील प्रशांत गुरूनाथ गायकवाड यांना शिक्षा सुनावण्यात आली. पीडित मुलगी तिच्या नातेवाईकाकडे 13 एप्रिल 2016 ते 25 मे 2016 दरम्यान राहण्यास आली होती. त्यावेळी हा प्रकार घडला होता. शिक्षा सुनावण्यात आलेली वर्षाही पीडित मुलीची नातेवाईक आहे. पीडित मुलीने झालेल्या सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. या खटल्यात पीडितेची साक्ष आणि वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले. अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पहिले तर सहायक पोलीस निरिक्षक पल्लवी मेहेर यांनी तपास लावला. आरोपींना पाच हजार रुपये आणि 20 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वर्षावर विश्वास ठेऊन पीडित मुलगी तिच्या घरी गेली होती मात्र तिनेच पीडितेवर आत्याचार करण्यासाठी आरोपींना मदत केली. म्हणून तिच्यावर दया दाखवता येणार नाही, असं न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात महिलेला शिक्षा देता येत नव्हती. मात्र 2013 साली या कायद्यात बदल करण्यात आला. त्या आधारावर वर्षा गायकवाड हिला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Bike Rally : प्रचाराचा शेवटचा दिवस, आदित्य ठाकरेंची भव्य बाईक रॅलीPratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget