एक्स्प्लोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ माजी आमदार रमेश कदम शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्त

Ramesh Kadam : अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधींचा घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार रमेश पोलिसांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणातून दोषमुक्त झाले आहेत.

Ramesh Kadam : अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधींचा घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार रमेश पोलिसांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणातून दोषमुक्त झाले आहेत. तुरुंगात शिक्षा भोगत असताना कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाला शिवीगाळ केल्याचा आरोप रमेश कदम यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी रमेश कमद यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी झाली. यामध्ये रमेश कदम यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ माजी आमदार रमेश कदम शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्त करण्यात आले आहे. आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणा-या पोलिसांना रमेश कदम शिवीगाळ करतानाची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली होती. याप्रकरणी रमेश कदमांविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाला होता. मात्र, पोलिसांनीच आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करत 25 हजारांची लाच मागितल्याचा कदमांनी कोर्टात दावा केला होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदम गेली काही वर्ष जेलमध्येच कैद आहेत. 

नेमकं काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ माजी आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यावेळी त्यांनी पोलिसाला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. जेलमधील एका पोलिस कॉन्टेबलने रमेश कदम यांना त्यांच्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जाताना पाहिलं. परत येण्यास सांगितलं असता कदमांचा पारा चढला आणि पोलिसाला शिवगाळ केली. असा आरोप होता. यानंतर नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये रमेश कदम यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा?
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळा घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना ऑगस्ट, 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. पहिल्यांदा त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसानंतर त्यांना भायखळ्याच्या पुरुष कारागृहात हलवण्यात आलं.  अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला होता.
काय आहेत आरोप?
 – कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती 
– उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं 
– नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले.
– अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या 
– लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले 
– महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्र वाटण्यात आले 
– विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
Embed widget