एक्स्प्लोर

लातूर कोरोनामुक्त, आठ कोरोनाबाधितांच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह

लातूरमध्ये आढळलेल्या 8 कोरोनाबाधितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबतची माहिती लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ट्वीट करून दिली आहे.

लातूर : लातूरकरांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. लातूरमध्ये आलेल्या बारा यात्रेकरुंना लॉकडाऊनमध्ये प्रवास करताना अडविण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले होते. गेल्या 48 तासातील दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे वैद्यकीय टीमने सुटकेचा श्वास सोडला आहे. यामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबतची माहिती लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ट्वीट करून दिली आहे. Coronavirus | मला फसवलं, 12 तब्लिगींसाठी फसवून पत्र घेतलं, तहसीलदारांची तक्रार  हरयाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका येथे गेल्या तीन महिन्यांपासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले 12 यात्रेकरू दोन एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदीत आढळून आले होते. या 12 जणांचे स्वब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता त्यातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या आठ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते तर अन्य चार जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू या सर्व यात्रेकरूंवर तसेच अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्या यात्रेकरूंवर उपचार करताना पुरेशी काळजी घेण्यात यावी आणि कोणत्याही परिस्थितीत याची कुणालाही लागण होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आणि या सर्वांवर उपचार करून लॉकडाऊननंतर त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिले होेते. हे सर्व यात्रेकरू निलंगा येथील ज्या मशिदीत आढळले होते. तिथे ते कोणाच्या संपर्कात आले. त्याचप्रमाणे त्यांच्या हरियाणा ते लातूर पर्यंतच्या प्रवासात कुठे आणि कुणाकुणाच्या संपर्कात आले, याचा शोध घेतला गेला होता. लातूरमध्ये आठ मुस्लीम यात्रेकरूंना कोरोनाची लागण; उत्तर भारतातून दक्षिणेकडे सुरू होता प्रवास कसा झाला होता या लोकांचा प्रवास? आंध्रप्रदेश येथील करनुल भागातील बाराजण हे जमातसाठी पंधरा डिसेंबरला निघाले होते. आंध्रप्रदेश आणि हरियाणा या राज्यात धार्मिक कामे केल्यानंतर ते करनुलकडे निघणार होते. त्यातच लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यांच्या रेल्वेचे तिकीट आरक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना काहीच करता आले नाही. हरियाणा येथील प्रशासनास कळवून त्यांनी पुढील प्रवास सुरु केला. तेथील तहसीलदार यांनी दिलेल्या पासवर खासगी गाडीतून मथुरा आग्रा, इंदोर, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, तुळजापूर या मार्गे ते निलंगा येथे आले. निलंगा येथे एक एप्रिलला ते दाखल झाले. त्यांनी करनुलच्या वैद्यकीय सेंटरला जाण्यासाठी मदत करा असे प्रशासनास सांगितले. लातूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्यातील आठ लोकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
Amravati Fire baby death: नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
Mumbai Crime News: राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
Eknath Shinde On Chakan MIDC Pune News: एकनाथ शिंदेंचे 8 आश्वासन, अधिकाऱ्यांना निर्देश; चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंचे 8 आश्वासन, अधिकाऱ्यांना निर्देश; चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Mumbai Crime News: राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
Amravati Fire baby death: नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
Eknath Shinde On Chakan MIDC Pune News: एकनाथ शिंदेंचे 8 आश्वासन, अधिकाऱ्यांना निर्देश; चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंचे 8 आश्वासन, अधिकाऱ्यांना निर्देश; चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन, नेमकं काय घडलं?
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Amravati hospital fire new born baby death: मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
Embed widget