एक्स्प्लोर

शिर्डीत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवे नियम; एका दिवसांत 8 हजार भाविकांना दर्शन

शिर्डीत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता नवे नियम करण्यात आले आहेत. एका दिवसांत जास्तीत जास्त आठ हजार भक्तांनाच दर्शन देण्यात येणार आहे. तसेच पास मिळाल्यानंतरच शिर्डीत येण्याचं आवाहन साई संस्थानाकडून भक्तांना करण्यात आलं आहे.

शिर्डी : दिवाळीतील पाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानंतर शिर्डीतील साई मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. एरवी 50 हजार भक्त दररोज शिर्डीत दर्शन घेत असत, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला 6 हजार भविकच दर्शन घेऊ शकणार असल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलं होतं. परंतु, सोशल डिस्टंन्सिंगचा बोजवारा उडत असल्यामुळे आता मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंदिर प्रशासनाने कंबर कसली आहे.

शिर्डीत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता नवे नियम करण्यात आले आहेत. एका दिवसांत जास्तीत जास्त आठ हजार भक्तांनाच दर्शन देण्यात येणार आहे. तसेच पास मिळाल्यानंतरच शिर्डीत येण्याचं आवाहन साई संस्थानाकडून भक्तांना करण्यात आलं आहे. तिरुपती बालाजी मंदिर संस्थानच्या धर्तीवर केवळ ऑनलाईन पास असणाऱ्या भाविकांनाच दर्शन दिलं जाणार असल्याच काही दिवसांपूर्वी मंदिर प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं.

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांसंदर्भात शिर्डी साई संस्थानाचे सीईओ कान्हूराज बगाटे यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, 'मंदिर भाविकांसाठी सुरु केल्यानंतर सुरुवातीच्या नियोजनानुसार, केवळ 6 हजार भक्तांना दर्शन दिलं जात होतं. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांची वाढलेली गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर मंदिर संस्थानाने 8 हजार भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'भाविकांची संख्या वाढवल्यानंतर स्वच्छतेची आणि सॅनिटायझेशनचीही काळजी घेण्यात येत आहे.' तसेच यावेळी पास मिळाल्यानंतरच शिर्डीत येण्याचं आवाहन बगाटे यांनी केलं आहे. तर ज्यांच्याकडे ऑनलाईन दर्शन पास असेल त्यांनाच दर्शन मिळणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मदिरं सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र मंदिर खुली झाली तरी कोरोनासंदर्भातील खबरदारी म्हणजे मास्क, हँड सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग यांचं पालन करणं भाविकांना बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Omraje Nimbalkar : 'लाईनमन म्हणून हिनवू नका', ओमराजे निंबाळकरांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल, तरुण फोनवर म्हणाला, 'विरोधात तुम्ही एकटेच नव्हतात दादा...'
'लाईनमन म्हणून हिनवू नका', ओमराजे निंबाळकरांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल, तरुण फोनवर म्हणाला, 'विरोधात तुम्ही एकटेच नव्हतात दादा...'
Nagpur Congress : विश्वास नांगरे पाटील यांना नागपूर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून संविधानाची प्रत भेट; म्हणे, 'संघ समजून घ्यायचे असेल, तर....
विश्वास नांगरे पाटील यांना नागपूर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून संविधानाची प्रत भेट; म्हणे, 'संघ समजून घ्यायचे असेल, तर....
LPG Gas price: मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: 'बेबी बाॅस' वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री होणार की नाही? अजूनही सस्पेन्स कायम, कॅप्टन श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या, पाऊस सुद्धा व्हिलन होण्याची चिन्हे
'बेबी बाॅस' वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री होणार की नाही? अजूनही सस्पेन्स कायम, कॅप्टन श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या, पाऊस सुद्धा व्हिलन होण्याची चिन्हे
Ketan Agarwal Death Case : भरपावसात पोलिसांनी चेतनला लोहगडावर आणलं, क्राईम सीनच्या रिक्रिएशनला सुरुवात
भरपावसात पोलिसांनी चेतनला लोहगडावर आणलं, क्राईम सीनच्या रिक्रिएशनला सुरुवात
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
Nashik Crime: वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ
वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ
LPG Gas price: मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Maharashtra Mumbai Rain Updates: मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Embed widget