LIVE UPDATE | पालघर साधू हत्याकांड प्रकरणी 54 जणांना जमीन मंजूर
राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाचरणी साकडं लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी 15 जानेवारीपासून नियम बदलणार! क्रीडा जगतासाठी अतिशय दुःखद बातमी! महान फुटबॉल खेळाडू मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाचरणी साकडं
क्रीडा जगतासाठी अतिशय दुःखद बातमी! महान फुटबॉल खेळाडू मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भरभराट होऊ दे, असंही अजित पवारांनी विठुरायाला साकडे घातले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. त्यानंतर ते बोलत होते.
आषाढी राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे , कोरोनाची लस लवकर उपलब्ध होऊन जगाची यातून सुटका कर असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातले . आज पहाटे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी कवडूजी भोईर व कुसुमाबाई भोईर हे मानाचे वारकरी दाम्पत्य महापूजेत सामील झाले होते.
लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी 15 जानेवारीपासून नियम बदलणार!
देशातील कोणत्याही मोबाईलवर 15 जानेवारीपासून लँडलाईनवरुन फोन करताना मोबाईल नंबर आधी 0 लावणे अनिवार्य असणार आहे. दूरसंचार मंत्रालयाने सांगितलं की, फिक्स टू फिक्स्ड डायलिंग प्लॅन आणि मोबाईल टू मोबाईल कॉलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दूरसंचार विभागाने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) प्रस्तावाला मान्यता दिली आहे. 29 मे 2020 रोजी ट्रायने अशा कॉलसाठी नंबर देण्यापूर्वी शून्य लावण्याची शिफारस केली होती. यामुळे टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाडर कंपन्यांना अधिक नंबर तयार करण्याची सुविधा मिळणार आहे.
दूरसंचार विभागाने 20 नोव्हेंबर रोजी एका परिपत्रकाद्वारे सांगितले की, लँडलाईनवरून मोबाईलवर नंबर डायल करण्याचा मार्ग बदलण्यासाठी ट्रायच्या शिफारशी मान्य केल्या गेल्या आहेत. या परिपत्रकानुसार नियम लागू झाल्यानंतर लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी नंबरच्या आधी शून्य डायल करा. दूरसंचार विभागाने सांगितले की मोबाईल नेटवर्क कंपन्यांना लँडलाईनच्या सर्व ग्राहकांना शून्य डायलिंग सुविधा द्यावी लागेल. ही सेवा सध्या आपल्या क्षेत्राबाहेरील कॉलसाठी उपलब्ध आहे. विभागाने निश्चित लाईन स्विचमध्ये योग्य ती घोषणा करण्यास सांगितले, जेणेकरुन फिक्स लाईन ग्राहकांना सर्व फोनवर कॉल करण्यासाठी 0 डायल करण्याची गरज आहे.
क्रीडा जगतासाठी अतिशय दुःखद बातमी! महान फुटबॉल खेळाडू मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. अर्जेंटिनाच्या मीडियाने याबाबत माहिती दिली. मॅराडोना यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मॅराडोनाच्या अनेक चाचण्या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आल्या. एका स्कॅनमध्ये मेंदूत ब्लड क्लोट होण्याची बाब उघडकीस आली. यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांपूर्वी मॅराडोना यांची कोरोना टेस्ट देखील झाली होती. परंतु, त्याचा अहवाल निगेटिव्ह आली. 1986 मध्ये, त्यांनी अर्जेटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता.
30 ऑक्टोबरला मॅराडोना यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या मॅराडोना यांना उच्च जोखमीचा रुग्ण म्हणून पाहिले जात होते. त्यांच्या बॉडीगार्डला कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यानंतर गेल्या आठवड्यात मॅराडोना स्वत: आयसोलेशनमध्ये गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
