LIVE UPDATES | सांगलीचे खासदार संजयकाका पाटील कोरोना पॉझिटिव्ह
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा नवा उच्चांक; एका दिवसात तब्बल 20 हजार 489 रुग्णांची नोंद पुण्यातील जम्बो रुग्णालयाचा स्टाफ बदलण्याच्या हालचाली सुरू; 120 कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, सूत्रांची माहिती माझा कट्टा | मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली : प्रशांत भूषण मी अडकले तर तुम्हाला सगळ्यांना अडकवेन, रियाची आपल्या गॉड फादरला धमकी कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
राज्यात काल कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा विक्रम; ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढतोय
राज्यात काल एका दिवसात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज दिवसभरात 19 हजार 218 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर आज नवीन 13 हजार 289 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 625773 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 21 हजार 0978 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.51% झाले आहे.
राज्यात कोरोना संसर्ग आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज राज्यात विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आज 19 हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली. परिणामी राज्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 लाख 63 हजार 62 झाली आहे. तर आज 378 कोरोना बाधित रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 25 हजार 964 इतकी झाली आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु: कुलगुरुंच्या अहवालानंतर अंतिम निर्णय
अंतिम वर्ष परीक्षेबाबत कुलगुरू समितीने दिलेल्या अहवालानंतर आणि राज्यपाल, कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभाग संचालक यांचेकडून शासन परिपत्रक विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. परीक्षा 50 मार्कांची तर वेळ एक तासाची असणार आहे. अंतिम परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे ही प्रक्रिया 31ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करुन सगळ्या विद्यापीठांना निकाल जाहीर करावा लागणार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.
अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु आहे. ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेन्ट बेस या तीन पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. या तीन पर्यायांपैकी प्रत्येक विद्यापीठ एक पर्याय निवडणार आहे. प्रॅक्टिकल ऐवजी तोंडी परीक्षा होणार आहे. काल राज्यपालांशी चर्चा झाल्यानंतर आज कुलगुरूंची समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. अकादमी कौन्सिलमध्ये जाऊन या अहवालाला परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर परीक्षा आयोगाकडे अहवाल मान्यतेसाठी पाठवावा लागेल.
PUBG च्या जागी येणार भारतीय FAU-G; खिलाडी अक्षय कुमारची घोषणा
तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला PUBG गेम बंद केल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यासर्वांना नाराज होण्याची गरज नाही. कारण, आता पबजी सारखाच भारतीय गेम लवकरच तरुणांच्या भेटीला येणार असल्याची माहिती बॉलिवूड अभिनेता आणि खिलाडी अक्षय कुमारने दिली आहे. अक्षयने ट्विट करत या गेमची बद्दल लिहलं आहे.
या गेमचे नाव FAU-G असे असून या गेमद्वारे होणाऱ्या कमाईचा 20% निधी हा जवानांना देण्यात येणार असल्याचे अक्षयने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे.
अभिमानाने सांगते मी मराठा आहे, तुम्हाला काय करायचं ते करा; कंगनाचा पलटवार
राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रनौतमधील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर कंगनाने पलटवार केला आहे. महाराष्ट्र कुणाच्याही बापाचा नाही. महाराष्ट्र त्यांचाच आहे ज्यांना मराठीचा अभिमान आहे. अभिमानाने सांगते मी मराठा आहे, माझं तुम्ही काय करणार? असं उत्तर कंगनाने ट्विटरवरुन दिलं आहे.
सिनेसृष्टीच्या शंभर वर्षात मराठा अभिमानावर एकही चित्रपट बनलेला नाही. मुस्लीमांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीमध्ये मी माझे जीवन आणि सिनेकारकीर्द पणाला लावली आहे. शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनवला. आज महाराष्ट्राच्या या कंत्राटदारांना विचारा, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय आहे? असं ट्वीट कंगनाने केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
