LIVE UPDATES | पक्षप्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी पार्थ पवार सिल्व्हर ओकवर
आयुष मंत्री श्रीपद नाइक कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला करीनाची इन्स्टाग्राम पोस्ट, करीना-सैफ पुन्हा आई-बाबा बनणार! काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचं हार्ट अटॅकने निधन राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय, 13 सप्टेंबरऐवजी 20 सप्टेंबरला परीक्षा कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
आयुष मंत्री श्रीपद नाइक कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला
आयुर्वेदाशी संबंधित केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालंय. श्रीपाद नाईक यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली. नाईक मोदी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत ज्यांना COVID 19 चं संक्रमण झालं आहे. याअगोदर गृहमंत्री अमित शाह आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे दोन्ही नेते रुग्णलयात भरती आहेत. दरम्यान, लक्षणं नसल्याने नाईक यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.
करीनाची इन्स्टाग्राम पोस्ट, करीना-सैफ पुन्हा आई-बाबा बनणार!
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा आई-बाबा बनणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. मीडियामध्ये करीनाच्या प्रेग्नंसीबाबत अनेक शक्यता वर्तवण्यात जात होत्या. शिवाय सैफ आणि करीनानेही यावर मौन बाळगलं होतं. परंतु आता खुद्द सैफ आणि करिनाने प्रेग्नंट असल्याच्या वृत्तावर मोहर लावली आहे. करिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसरा छोटा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. “आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद”, असं सैफ व करीनाने म्हटलंय.
काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचं हार्ट अटॅकने निधन
काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. काँग्रेसचे आक्रमक प्रवक्ते म्हणून राजीव त्यागी यांची ओळख होती. टिव्हीवरील चर्चासत्रांमध्ये ते नेहमीच काँग्रेसची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. राजीव त्यागी यांच्या निधनानंतर काँग्रेसने ट्वीट करुन दुःख व्यक्त केले. 'राजीव त्यागी यांच्या आकस्मिक निधनाने मोठं दुःख झालं, ते एक कट्टर काँग्रेसी आणि एक सच्चा देशभक्त होते.'',