Corona Vaccine | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयात कोरोना लस घेतली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयात कोरोना लस घेतली आहे. मुख्यमंत्र्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत भारत बायोटेकची को-वॅक्सिन लस घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री असे तीन जणांना लस देण्यात येत आहे. राज्यात कोराना लसीकरणाला सुरुवात झाली ती 16 जानेवारीपासून. तेव्हापासून सातत्यानं हा प्रश्न विचारला जात होता की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी लस घेणार? आज या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं. मुंबईतल्या जे जे रूग्णालयात आज मुख्यमंत्र्यांनी लस टोचून घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस घेतल्यानंतर राज्यात लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यात लसीकरण वेगाने वाढवलं जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावं लागेल. जिथे आवश्यक आहे तिथे कडक लॉकडाऊन करावं लागेल. नागरिकांना विनंती आहे की लसीकरण करुन घ्या. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळा आणि मास्क वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं.
मुख्यमंत्र्यांनी नियम पाळला, मोदींनी नाही
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हात धुवा, मास्क लावा, सोशल डिस्टन्स पाळा असं आवाहन पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार करतात. मास्क कधीही काढू नका असं मोदी सातत्याने सांगत असतात. परंतु कोरोनाची लस घेताना स्वत: पंतप्रधानांनी मास्क लावलेला नव्हता. त्याउलट मुख्यमंत्र्यांनी मात्र कोरोना लस घेताना कोरोनाविषयक नियमांचं पालन करत मास्क लावला होता. त्यामुळे मास्क न काढण्याचं आवाहन करणाऱ्या मोदींनी कोरोना लस घेताना मास्क काढल्याने त्यांच्यावर प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
Lockdown Big Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य
Lockdown In Nagpur | नागपुरात लॉकडाऊनची घोषणा