Corona Update | राज्यात कोरोनाचं थैमान, रविवारी राज्यात विक्रमी 63,294 नवीन रुग्णांचे निदान
रविवारी राज्यात कोरोना रुग्णांच्या उच्चांकांची नोंद झाली आहे. रविवारी 63 हजार 294 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 34 हजार 008 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. कारण रविवारी राज्यात कोरोना रुग्णांच्या उच्चांकांची नोंद झाली आहे. रविवारी 63 हजार 294 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात शनिवारी 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी, 34 हजार 008 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 349 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्के एवढा आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 27 लाख 82 हजार 161 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.65 टक्के एवढे झालेआहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,21,14,372 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 34,07,245 (15.41 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 31,75,585 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,२694 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत 9989 कोरोनाबाधित रुग्णांनी नोंद
मुबंईत गेल्या 24 तासात 9989 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8554 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर 4 लाख 14 हजार 641 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के आहे. सध्या मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजार 464 आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 35 दिवसांवर आला आहे.
पुण्यात 12 हजार 377 रुग्णांची नोंद
पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 12377 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 87 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात 6679 रुग्ण, पिंपरी चिंचवड क्षेत्रात 2409 रुग्ण तर पुणे ग्रामीण क्षेत्रात 2465 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
संबंधित बातम्या
- मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबतची बैठक; ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? टास्कफोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरुच