Corona UK Strain : ब्रिटनमधून आलेल्या महाराष्ट्रातील 8 जणांना कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची लक्षणं, राजेश टोपेंची माहिती
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या आता 38 वर पोहोचली आहे. अशातच ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये राजेश टोपे म्हणाले, ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 4, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथे कोरोना लसीकरणाबाबत बैठक घेतली. तसेच ब्रिटनहून आलेल्या 8 प्रवाशांना नव्या विषाणूची लागण झालेली आहे त्याबाबत आरोग्य विभाग व मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली व अधिक दक्षता ठेवण्याचे निर्देश दिले.
21 तारखेला ब्रिटन हुन बुलढान्याच्या खामगाव येथे आलेले दोन्ही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पण नवीन म्युटेड UK व्हायरस नाही. आजच पुण्याच्या NIV कडून दोघांचे अहवाल आलेत . एकाच रुग्णाची जेनेटिकल मैपिंग केल्याची माहिती आहे. दुसऱ्याची जीनोम सिक्वेन्सिंग आवश्यकता नाही. दोन्ही रुग्णांना तुर्तास शासकीय विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.महाराष्ट्रात कोरोनाचं हे नवं संकट राज्यात धडकण्यापूर्वीच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आणि त्याच धर्तीवर नियमांचं अधिक काटेकोरपणे पालन केलं गेलं. देशात युकेहून परतलेल्या आणि प्रवासाचा संदर्भ असलेल्या काही प्रवाशांना कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त हाती आलं आणि तणावाच्या परिस्थितीत आणखी वाढ झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे- कल्याण, पुणे अशा ठिकाणी युकेहून आलेल्या प्रवाशांची संख्याही हजारांच्या घरात पोहोचली.
आतापर्यंत कुठे किती नव्या स्ट्रेनचे रुग्ण?
- एनसीडीसी दिल्ली - 8
- NIMHANS बँगलोर - 10
- NIV पुणे - 5
- आयजीआयबी दिल्ली - 11
- सीसीएमबी हैदराबाद - 3
- एनआयबीएमजी कल्याणी- 1
जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत (एनआयबीएमजी कोलकाता, आयएलएस भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, एनसीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीडीएफडी हैदराबाद, इंस्टेम बंगळूरू, एनआयएमएचएएनएस बंगळूरू, आयजीआयबी दिल्ली, एनसीडीसी दिल्ली) बाधित नमुन्यांची चाचणी घेण्यात येत आहे.
या सर्व व्यक्तींना संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या आरोग्य सेवा सुविधांमध्ये अलगीकरणात स्वतंत्र खोलीत ठेवले आहे. या सर्व व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना देखील विलगीकरणात ठेवले आहे. सहप्रवासी, कुटुंबातील संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि इतरांसाठी व्यापक संपर्क ट्रेसिंग सुरू केली आहे. इतर नमुन्यांवरील जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सुरू आहे.
ही परिस्थिती सावधगिरीने हाताळली जात असून ही देखरेख ठेवणे, नियंत्रण ठेवणे, चाचणी करणे आणि आयएनएसएसीओजी प्रयोगशाळांमध्ये नमुने पाठविण्याबाबत राज्यांना नियमित सल्ला देण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :