एक्स्प्लोर

कोरोना हॉटस्पॉट मालेगाव शहरात संपूर्ण संचारबंदी आदेश जारी

मालेगावात काल 5 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच दिवसेंदिवस संशयितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. मालेगावात आत्तापर्यंत कोरोनाचे 2 बळी गेले आहेत.

नाशिक : कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मालेगाव शहरात कर्फ्यू आदेश जारी करण्यात आले आहेत. एकट्या मालेगावात 36 कोरोना रुग्ण आढळताच संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. आज सकाळी 7 वाजेपासून 30 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत मालेगावात पूर्णतः संचारबंदी असणार आहे. आजपासून मालेगावमध्ये सर्व बँक 5 दिवस बंद राहणार आहेत. शहर तसेच मालेगाव हद्दीपासून 2 किमी परिघातील सर्व पेट्रोलपंप देखील बंद राहणार आहेत. तसेच हातगाडीवरुन भाजी विक्री आणि किराणा दुकाने यांना सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. या कर्फ्यूमधून वैद्यकीय सेवा, दूध व चारा आणि गॅस एजन्सी यांना वगळले आहे. या कर्फ्यूदरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी शहरात 502 पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखील पोलिस दलाच्या 4 तुकड्या दाखल यासोबतच इतर जिल्ह्यातून अतिरिक्त फौजफाटाही दाखल झाला आहे. मालेगावात आजपर्यंत विनाकारण फिरणाऱ्या 300 वाहन चालकांकडून 58 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. Coronavirus | मालेगावात अचानक कोरोना बाधितांचा आकडा कसा वाढला? मालेगावात काल 5 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच दिवसेंदिवस संशयितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.  मालेगावात आत्तापर्यंत कोरोनाचे 2 बळी गेले आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण 42 बाधित आहेत यापैकी 36 मालेगावात तर  नाशिक शहरात 3, सिन्नर 1, चांदवड 1, लासलगावमध्ये एका कोरोनाबाधिताचा समावेश आहे. मालेगाव शहरात यंत्रमागावर काम करणारे लोक असून अत्यंत दाटीवाटीच्या घरांमध्ये ते राहत असल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही, तर यंत्रमागाच्या तयार होणाऱ्या कापडाचे बारीक कण हे नाकावाटे, तोडा वाटे कामगार तसेच नागरीकांच्या तोंडात जात असल्याने दम्यांचे आजार होतात. कदाचित त्यामुळे कोरोना बाधितांना त्याचा अधिक संसर्ग वाढत असल्याचं बोललं जात आहे. सहा एप्रिलला सामान्य रुग्णालय मालेगाव येथे दाखल झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. सोबतच आणखी चार जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते. एकाच वेळी पाच रुग्ण सापडताच नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मालेगाव गाठत कृषी मंत्री आणि यंत्रणेसोबत बैठक घेत सर्व आढावा घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Embed widget