एक्स्प्लोर
विदर्भात पारा 45 अंशांवर, महावितरण अधिकाऱ्यांनी चक्क ट्रान्सफॉर्मरलाच कूलर बसवले
अमरावतीकरांनी शक्कल लढवत चक्क ट्रान्सफॉर्मरलाच कुलर बसवले आहेत.
अमरावती : अमरावती जिल्ह्यात तापमानाचा पारा गेल्या काही दिवसात कमी होताना दिसत नाही. विदर्भात सर्वत्र तापमान 45 अंशाच्या पार गेलं आहे. त्यामुळे अमरावतीकरांनी शक्कल लढवत चक्क ट्रान्सफॉर्मरलाच कुलर बसवले आहेत.
वाढत्या उकाड्यामुळे अमरावतीकर नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अमरावतीचा पारा 45 अंशापार गेल्यापासून अमरावतीकर विविध प्रयोग करताना दिसत आहेत. अमरावतीमधील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या 33 केवी केंद्रामध्येही अशीच शक्कल लढवण्यात आली आहे. अमरावतीतील पॉवर ट्रान्सफार्मरला चक्क कुलर लावण्यात आले. पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील ऑईलचं तापमान थंड करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढविली आहे.
पॉवर ट्रान्सफॉर्मर हे जर थंड राहीले तरच अमरावतीकरांना अखंडित वीज पुरवठा होईल आणि या दोन पॉवर ट्रान्सफॉर्मरची किंमत जवळपास एक कोटी रुपये आहेत. त्यासाठी ही अनोखी शक्कल लढविण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement