एक्स्प्लोर
Advertisement
निलेश राणेंवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा
रत्नागिरी : काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी पक्षाच्याच एका पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. निलेश राणेंनी अपहण करुन मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांनी केली आहे.
निलेश राणे यांच्याविरोधात ठाणे नगर पोलिस स्टेशनमध्ये अपहरण आणि मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी रत्नागिरीमध्ये रविवारी निलेश राणे यांची सभा होती. परंतु या सभेला संदीप सावंत कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले नाहीत. याच रागातून संदीप सावंत यांचं चिपळूणजवळच्या घरातून मुंबईला नेण्यात आलं. तसंच प्रवासादरम्यान गाडीत मारहाण केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
स्वत: निलेश राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांना धमकी दिल्याचाही आरोप आहे.
संदीप सावंत यांच्या पत्नीचा दावा
दरम्यान, संदीप सावंत यांनीही काल काय प्रकार घडला याबाबतची माहिती माध्यमांना दिली. "स्वत: निलेश राणे आणि त्यांचे बॉडिगार्ड आमच्या घरी आले. त्यावेळी आम्ही जेवत होतो. निलेश राणेंनी संदीप यांना खाली येण्यास सांगितलं. त्यानंतर खाली गेल्यावर त्यांना मारहाण करुन गाडीत घालून घेऊन गेले," असं संदीप सावंत यांच्या पत्नीने सांगितलं.
यानंतर रात्रभर संदीप सावंत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन लागत नव्हता. पहाटे पाचच्या सुमारास आमदार नितेश राणेंना फोन केला. मग राणेसाहेबांच्या पत्नीला फोन केला, त्यांनी थोड्यावेळानंतर संदीप घरी पोहोचतील असं सांगितल्याचं संदीप सावंत यांच्या पत्नी म्हणाल्या.
निलेश राणेंची प्रतिक्रिया
दरम्यान, ही माझ्याविरुद्ध राजकीय खेळी असल्याची प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली आहे. तसंच संदीप सावंत 10 लाख रुपये मागत होते. पैसे दिले नाहीत म्हणून आरोप करत असावेत, असंही निलेश राणे म्हणाले.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement