एक्स्प्लोर
महापालिकेला संभाजीनगर नाव द्या, उत्तमसिंह पवारांचा सल्ला
वाळूंज भागातील काही गावं एकत्र करुन महापालिका करावी आणि त्याला संभाजीनगर असं नाव द्यावं, असं उत्तमसिंह पवार म्हणाले.

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करा, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर आता काँग्रेसचे माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी नवा उपाय शोधला आहे. काही गावांच्या महापालिकेला संभाजीनगर नाव देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी होत आहे. विशेषतः शिवसेनेने ही मागणी उचलून धरली आहे. वाळूंज भागातील काही गावं एकत्र करुन महापालिका करावी आणि त्याला संभाजीनगर असं नाव द्यावं, असं उत्तमसिंह पवार म्हणाले. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे.
औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना शहराचं नामकरण करायचं नाही. फक्त त्यावरुन राजकारण करायचं आहे, असा टोलाही उत्तमसिंह पवारांनी खैरेंना लगावला.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























