(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole On Bjp : केंद्र सरकारच्या अत्याचाराविरोधात इंग्रजांच्या काळाप्रमाणं रस्त्यावर उतरण्याची गरज : नाना पटोले
महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार फेल झालं आहे. त्यामुळं केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
Nana Patole On Bjp : जे नेते भाजप विरोधात बोलतात त्यांच्या मागे ससेमिरा लावला जात आहे. महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार फेल झालं आहे. त्यामुळं केंद्र सरकारच्या अत्याचाराविरोधात इंग्रजांच्या काळाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. जर संजय राऊत सरकारच्या विरोधात बोलत असतील आणि त्यासाठी त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर त्यात वावगे काय, असेही पटोले म्हणाले.
केंद्र सरकारे हे केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय विरोधकांविरोधात गैरवापर करत आहे. हे गाऱ्हाणं सांगायला शरद पवार पंतप्रधानांना भेटले असल्याचे पटोले म्हणाले. पंतप्रधान कोणत्या पक्षाचा नसतो असे आम्ही समजतो. शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे संजय राऊत संदर्भातील परिस्थितीही सांगितली असल्याचे नाना पटोले म्हणाले.
भाजपच्या नेत्यांकडून जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न
आपल्याला माहीत आहे की, महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरु झाला होता. आता काही राजकीय पक्ष मशिदीवरील भोंगे काढावे असा फतवा काढत आहेत आणि राज्याचे भाजपचे नेते त्याला पाठिंबा देत आहेत. म्हणजेच भाजपचे नेते जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न आहेत. महाराष्ट्राची जनता अशा प्रयत्नांना कधीही पाठिंबा देणार नाही जनता समजूतदार असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. सेव विक्रांत या नावाने पैसे गोळा केले आणि ते राज्यपालांकडे दिल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. मात्र, राजभवन म्हणते कोणतेही पैसे मिळाले नाहीत. हे जनतेच्या पैशाची लूट करत आहेत. हे सर्व रेकॉर्डवर आहे. आम्ही रेकॉर्ड नसलेल्या गोष्टी त्यांच्यासारखं करत नसल्याचे पटोले म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनीही एका कार्यक्रमात उल्लेख केलेला आहे, की ईडी आणि सीबीआयचा वापर चुकीच्या पद्धतीने होत आहे. राजकीय उद्देशाने होत आहे. आपण इथेच राहू राजकीय व्यवस्था बदलत राहते असे ते म्हणाले होते. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने आता या गोष्टींचा विचार करावा अशी आमची मागणी होती, असेही पटोले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: