एक्स्प्लोर

केडगाव शिवसैनिकांची हत्या प्रकरण : काँग्रेस नगरसेवकाला अटक

संशयित प्रमुख सूत्रधार काँग्रेसचा नवनिर्वाचित नगरसेवक विशाल कोतकरला अटक करण्यात आली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव परिसरातून पहाटे त्याला अटक करण्यात आली.

अहमदनगर : केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील संशयित प्रमुख सूत्रधार काँग्रेसचा नवनिर्वाचित नगरसेवक विशाल कोतकरला अटक करण्यात आली आहे. नगर तालुक्यातील कामरगाव परिसरातून पहाटे त्याला अटक करण्यात आली. मुख्य मारेकरी संदीप गुंजाळने विशाल कोतकरच्या सांगण्यावरुन हे हत्याकांड झाल्याचं तपासात सांगितलं होतं. त्यानंतर विशाल कोतकरचा शोध सुरु होता. अखेर विशाल कोतकरला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. या हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापसह आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आलेली आहे. काय आहे प्रकरण? बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली होती. शनिवारी 7 एप्रिलला हे हत्याकांड झालं. त्यानंतर जसे नावं समोर येतील, त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली. एसपी कार्यालयातील तोडफोड प्रकरणी गुन्हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिजीत कळमकर, आमदार संग्राम जगताप यांचे भाऊ, झेडपी सदस्य सचिन जगताप, नगरसेवक कैलास गिरवले यांच्यासह चार नगरसेवक आणि अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर एसपी कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील अनेकांना अटक करण्यात आली होती. संबंधित बातम्या : अहमदनगर हत्याकांड : 600 शिवसैनिकांवर गुन्हे UPSC ते शिवसैनिकांच्या हत्येचा आरोपी - संदीप गुंजाळ शिवसैनिकांची हत्या : राष्ट्रवादीच्या बदनामीचं षडयंत्र : अजित पवार शिवसैनिकांची हत्या: भाजप आमदार शिवाजी कर्डिले अटकेत नगरमध्ये तणाव, पालकमंत्री राम शिंदे थीम पार्कच्या उद्घाटनाला शिवसैनिकांची दुहेरी हत्या, आमदार संग्राम जगतापांना पोलिस कोठडी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Tukaram Mundhe Pune FDA Action: पुण्यातील पेठाही आता FDAच्या रडारावर; अनेक मिठाईच्या दुकानावर छापे, 4 दिवसांत 45 लाख 70 हजार अन्नसाठा जप्त, 5 हॉटेलचे परवानेही निलंबित
पुण्यातील पेठाही आता FDAच्या रडारावर; अनेक मिठाईच्या दुकानावर छापे, 4 दिवसांत 45 लाख 70 हजार अन्नसाठा जप्त, 5 हॉटेलचे परवानेही निलंबित
Pune Baramati Crime News Mangesh Jagtap: 21 वर्षांचं प्रेम, लग्नाचे आमिष दाखवलं अन् महिलेसोबत नको ते केलं, अखेर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश जगतापांवर गुन्हा दाखल
21 वर्षांचं प्रेम, लग्नाचे आमिष दाखवलं अन् महिलेसोबत नको ते केलं, अखेर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश जगतापांवर गुन्हा दाखल
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Embed widget