नंदुरबार : कोरोना काळात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज आहे, मात्र रुग्णालयामध्ये वाया जाणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाणही अधिक आहे. रुग्णालयातील वाया जाणारा ऑक्सिजन वाचवण्यासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना राबवली गेली आहे. हीच संकल्पना राज्यभर राबवण्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. काय ऑक्सिजन सिस्टर संकल्पना पाहुयात.


कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनवर असलेलं रुग्ण जेवण करताना किंवा टॉयलेट बाथरूम जाताना त्यांच्या बेडवरील ऑक्सिजन फ्लो तसाच सुरू राहतो. त्यामुळे आक्सिजन वाया जात असतो. तसेच काही रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल चांगली असेल तर ऑक्सिजनचे प्रमाण कमी केलं तर वाया जाणारा ऑक्सिजन वाचवता येतो. म्हणून जिल्हा रुग्णालयात 50 बेडच्या मागे एक ऑक्सिजन सिस्टर नेमण्यात आली आहे, ती फक्त या रुग्णांच्या ऑक्सिजनची पाहणी करत असते. 


Maharashtra Lockdown Extended | राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत कायम, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय


ऑक्सिजनला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक महत्व आले आहे. त्यामुळे रुग्णालयात वाया जाणारा ऑक्सिजन वाचवण्यासाठी ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना राबवण्यात आली. जिल्हा रुग्णालयात असलेल्या 150 ऑक्सिजन बेडसाठी 3 नर्स या ऑक्सिजन सिस्टरचे काम करणार आहेत. त्या ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांवर लक्ष ठेऊन राहतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची बचत होते.


Covid 19 Vaccination Free : महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय


ऑक्सिजन सिस्टर हा प्रयोग चांगला असून यातून मोठ्या प्रमणात ऑक्सिजनची बचत होत असते. त्यामुळे संपूर्ण राज्यात ही संकल्पना राबवली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देश आणि राज्य ऑक्सिजन  संकटातून जात आहे. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा ऑक्सिजनची कशी बचत करता येईल हे सांगणारा नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे.