मुंबई : बॉलिवूड कलाकार गेल्या काही दिवसांपाासून ट्रोल होत आहेत.  एकिकडे राज्यातली, देशातली स्थिती नाजूक होत असताना, कलाकार देश सोडून परदेशात जाऊ लागले.  त्यावरून नवाजुद्दिन सिद्दीकीने कानउघडणी केल्यानंतर आता हिंदी कलाकारांना जाग येऊ लागली आहे. अजय देवगण, अक्षयकुमार, आयुषमान खुराना, सोनू सूद यांनी आता कोविडसाठीच्या योजनांना गती आणली आहे. 

Continues below advertisement

अजय देवगणने शिवाजी पार्कातल्या भारत अँड स्काउट्स गाईड हॉलमध्ये 20  बेडचं रुग्णालय उभारलं जाणार आहे. त्यासाठी अजय देवगणच्या एनवाय फाउंडेशनमार्फत त्या उभारणीसाठी मदत देऊ केली आहे. अजयने गेल्यावर्षी धारावीमध्ये कोव्हिड सेंटर उभारणीसाठी मदत देऊ केली होती. 

अजय पाठोपाठ आता अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्नाही पुढे आले आहेत. यापूर्वी त्यांनी दिल्लीतल्या गौतम गंभीर फाउंडेशनला एक कोटीची मदत दिली होती. आता मुंबईत अक्षयकुमार आणि ट्विंकल मिळून 120 ऑक्सिजन सिलिंडर्सची मदत केली आहे. ट्विंकलने सोशल मीडियाावरून ही माहिती दिली. 

Continues below advertisement

Corona Crises | कोरोना संकटात ब्रेट लीची 41 लाखांची मदत; भारतीयांसाठी शेअर केली खास पोस्ट

दुसरीकडे आयुषमान खुरानाने आपल्या पत्नीसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत देऊ केली आहे. इन्स्टाग्रामवर त्याने ही माहिती उघड केली आहे. शिवाय त्याने इतरांनाही मदतीचंआवाहन केलं आहे. 

अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा मदतीला धावला आहे. सूद फाउंडेशनच्या वतीने त्याने कोविड 19 फ्री हेल्प सेटर उभारलं आहे. यात डॉक्टरांचा सल्ला आणि कोविड टेस्टचा समावेश होतो. सोनूने कोविडच्या पहिल्या लाटेवेळी केलेली मदत सगळ्यांना माहित आहेच. आता कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेऊन हे मोफत सल्ला केंद्र त्याने उभारलं आहे. 

Covid 19 Vaccination Free : महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

अक्षय पाठोपाठ आता सुनील शेट्टीनेही केव्हीएन फाउंडेशनसोबत हातमिळवणीकरून ऑक्सिजन सिलेंडर्स देऊ करायचं ठरवलं आहे. मुंबई आणि बंगलोरमध्ये हे सिलेंडर पोचवले जाणार आहेत. मालदिवला  गेल्यानंतर ट्रोल झालेल्या बॉलिवूड कलााकारांना आता शहाणपण येऊ लागला आहे. ते म्हणतात ना दुर्घटना से देर भली. तसं झालंय.