(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Uddhav Thackeray : शाळेत मोकळं ढाकळं वातावरण ठेवा, पण काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
CM Uddhav Thackeray LIVE: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला.
CM Uddhav Thackeray LIVE: आज राज्यात शाळा तब्बल दीड वर्षांनंतर सुरु झाल्या. विद्यार्थ्यांचं अनेक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे. यानिमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले की, पुन्हा शाळेची घंटा वाजली आहे. मला आज माझ्या शाळेचे दिवस आठवत आहेत. आजच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात कठिण आणि आव्हानात्मक काळ आहे. शिक्षकांना आणि पालकांना आवाहन आहे की, आपल्या विद्यार्थ्यांची आणि पाल्यांची काळजी व्यवस्थित घ्या, असं ते म्हणाले. शाळांची दारं, खिडक्या उघडी करा. मोकळं ढाकळं वातावरण ठेवा. शाळा परिसर निर्जंतुकीकरण करा. मुलांमध्ये अंतर ठेवण्याची काळजी घ्या, असंही ते म्हणाले. आपण एकदा उघडलेली शाळा पुन्हा बंद होऊ देणार नाहीत, याची आपण दक्षता घेऊ, असंही ते म्हणाले.
वर्षा गायकवाड काय म्हणाल्या..
आमचे विद्यार्थी आमची जबाबदारी आहेत, ह्या प्रतिज्ञेसह विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यास आम्ही पुन्हा एकदा सज्ज आहोत, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. कोरोनानंतरच्या परिस्थितीत #माझे_विद्यार्थी_माझी_जबाबदारी अंतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण प्रदान करावयास शाळा, मुख्याध्यापक,शिक्षक,शाळा व्यवस्थापन कमिटी,पालक आदींच्या जबाबदाऱ्या निश्चित आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना उत्तम निरंतर शिक्षण व त्यांचे मूल्यमापन होईल, असंही त्या म्हणाल्या.
शिक्षणोत्सव साजरा
आज शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी अनेक ठिकाणी शिक्षणोत्सव साजरा केला गेला. यामध्ये विद्यार्थ्यांचा अनौपचारिक स्वागत केले गेले. कुठं फुलांची सजावट करुन तर कुठं विद्यार्थ्यांना चॉकलेट्स देत स्वागत करण्यात आलं. सोबतच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत, नियोजनाचे फोटो समाजमाध्यमावर पोस्ट करण्यास सांगितले आहे. #शिक्षणोत्सव या नावाने फेसबुक, इंस्टा, ट्विटर हे फोटो पोस्ट करण्यात यावेत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागानं केल्या होत्या.
राज्यातील बोगस विद्यार्थी होणार उघड, परभणीत आढळले 14 हजार बोगस विद्यार्थी
मुंबईतील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू
दीड वर्षांपासून बंद असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा आज 4 ऑक्टोबरपासून सुरु झाल्या. मुंबई परिक्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या एकूण शाळा 2553 आहेत व त्यात एकूण विद्यार्थी 5, 13, 502 विद्यार्थी शिक्षण घेतात.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI