Uddhav Thackeray : कोरोना काळात उद्धव ठाकरे मास्क लावून घरात बसून नोटा मोजत होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार
Eknath Shinde: कोरोनाकाळात आम्ही पीपीई किट घालून फिरत होतो आणि उद्धव ठाकरे घरात बसून नोटा मोजत होते, असा पलटवार केला आहे,.
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज पत्रकार परिषद घेत राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरुन राज्य सरकावर निशाणा साधला. तसेच नांदेडच्या शासकीय (Nanded Hospital Death) रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावरुन ठाकरेंनी टीका केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. कोरोनाकाळात आम्ही पीपीई किट घालून फिरत होतो आणि उद्धव ठाकरे घरात बसून नोटा मोजत होते, असा पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे पीपीई किट घालून फिरत होतो आणि हे (उद्धव ठाकरे) घरात बसून नोटा मोजत होते. राज्याचा मुख्यमंत्री घरात बसून काम करू शकतो हे सांगत असणाऱ्यांचं सत्य बाहेर येईल. भ्रष्टाचाराचे पैसे कुठे जात होते हे लवकरच बाहेर येईल. सुप्रिम कोर्टानं तारिख देऊन सुनावणी पुढे गेली, सुप्रीम कोर्टाला अनेक कामे आहे. यांच्या बाजूने निकाल लागला तर चे चांगलं आणि वेगळे काही बोलले तर चुना आयोग म्हणतात.
उद्धव ठाकरेंच्या काळात मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार (Eknath Shinde On Covid Scam )
एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव टाकरेंनी केलेली मागणी चांगली आहे. कारण त्यांच्या काळात कोविड घोटाळा झाला आहे. मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा जो प्रकार झालाय तो समोर येईल. जे झालं ते वाईट झालं. मात्र ज्यांनी बॉडीबॅग, खिचडी, औषधांची खरेदी यात घोटाळा केला तो समोर येईल. नांदेडमधे औषध खरेदी जर घोटाळा झाला असेल. हलगर्जीपणा झाला असेल तर त्यावर नक्की कारवाई होईल. कोविड काळात मास्क लावून घरातून फेसबुक लाईव्ह करत होते, भेटायला येणाऱ्यांना अँटीजेन टेस्ट करायाल लागावायचे त्यांचं सत्य पुढे येईल.
नांदेड घटनेतील दोषींना पाठीशी घालणार नाही (Eknath Shinde On Nanded Hospital Death)
उद्धव ठाकरे सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, मृतांचे राजकारण केले हे दुर्दैव आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खायची सवय लागली आहे. कोविडमध्ये मृतांच्या बँगमधे पैसे खाणारे हे बोलतात. नांदेड घटनेची सगळी चौकशी होऊ दे, दोषींना पाठीशी घालणार नाही. कोविडमधे तोंडाला मास्क लावून बसत होते. आम्ही पीपीई किट खालून फिरत होतो.
हे ही वाचा: